---Advertisement---

हंगरगेकरने सांगितले आपल्या आयुष्यातील ‘त्या’ खेळाडूचे स्थान! म्हणाला, “त्याच्याकडून तुम्हाला केवळ…”

---Advertisement---

श्रीलंकेत सुरू असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाए उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत केले. गोलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला. असे असताना, भारताचा युवा अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने आपल्या कारकिर्दीतील एमएस धोनीचे स्थान सांगितले.

मागील वर्षे झालेल्या अंडर 19 विश्वचषकात दमदार कामगिरी केल्यानंतर राजवर्धन हा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याला आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघात सामील करून घेतले. त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी, संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंचे मार्गदर्शन त्याला लाभले. या संघाचे नेतृत्व करणारा एमएस धोनी याचा देखील त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. धोनीच्या प्रभावाबद्दल बोलताना राजवर्धन म्हणाला,

“इतरांप्रमाणे मी देखील त्याला केवळ टीव्हीवर खेळताना पाहिलेले. मी त्याला पहिल्यांदा भेटलो हा एक अनमोल क्षण होता. तुम्ही त्याला जितके पाहता त्याच्या जवळ जातात त्यावेळी तुम्हाला फक्त शिकायलाच मिळते. तो फलंदाजी करो अथवा नेतृत्व करो मी त्याला केवळ पाहत राहायचो. फलंदाजी करताना त्याच्या इतके शांत राहणे हा माझा नेहमीच प्रयत्न असतो.”

राजवर्धन याला यावर्षी आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता इमर्जिंग एशिया कप मध्ये त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात दोन, दुसऱ्या सामन्यात तीन तर तिसऱ्या सामन्यात पाच बळी मिळवले. पाकिस्तान विरुद्ध पाच बळी घेणारा इंडिया ए संघाचा तो पहिला गोलंदाज ठरलेला.

(Rajvardhan Hangargekar Talk About Dhoni Presence In His Life)

महत्वाच्या बातम्या –
सलामीवीर बनताच रोहितची कारकीर्द गेली टॉपवर! एकदा आकडेवारी पाहूनच घ्या
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---