---Advertisement---

‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 3:41 PM
rajwardhan-hangargekar
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. वेस्ट इंडीज येथे झालेला एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक गाजवणारा उस्मानाबादचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकर याने देखील या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात सातत्याने १४५ किमी पेक्षा वेगाने गोलंदाजी करणाऱ्या राजवर्धनवर मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. वेगवान गोलंदाजी व आक्रमक फटकेबाजी अशी त्याची ओळख आहे. मुंबई इंडियन्स व लखनऊ सुपरजायंट्स या संघांनी त्याच्यावर बोलीची सुरुवात केली. मात्र, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याच्यावर १ कोटी ५० लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले.

राजवर्धन देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो मूळचा उस्मानाबाद तेथील आहे. त्याने या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---