---Advertisement---

दे घुमा के! अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत राजवर्धनने महाराष्ट्राला मिळवून दिला थरारक विजय

On: मंगळवार, नोव्हेंबर 15, 2022 11:56 PM
Rajvardhan-Hangargekar
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy 2022) मंगळवारी (15 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध बंगाल असा सामना खेळला गेला. रांची येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर महाराष्ट्राने 3 गडी राखून विजय मिळवला. युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर (Rajwardhan Hangargekar) याने अखेरचा चेंडूवर षटकार ठोकत संघाचा विजय साकार केला.

रांची येथे झालेल्या या सामन्यात बंगाल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर सुदीप घरामी याने योग्य ठरवला. त्याने 132 चेंडूवर 127 धावांची शानदार खेळी केली. त्याला अष्टपैलू शाहबाज अहमदने 64 धावांची खेळी करून योग्य साथ दिली. बंगालने निर्धारित 50 षटकात 6 बाद 279 धावा केल्या.

या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राला राहुल त्रिपाठीच्या रूपाने पहिला धक्का बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 40, केदार जाधव 42 व सौरभ नवले याने 34 धावांचे योगदान दिले. अझीम काझी याने आक्रमक धोरण स्वीकारत केवळ 97 चेंडूवर 106 धावा फटकावल्या‌. सामना अटीतटीचा झाला असताना अखेरच्या षटकात महाराष्ट्राला काझीच्या रूपाने धक्का बसला. अखेरच्या चेंडूवर त्यासाठी चार धावांची गरज असताना युवा अष्टपैलू राजवर्धन हंगारगेकर याने षटकार ठोकत संघाला विजयी केले.

राजवर्धन हंगारगेकर याने भारताच्या अंडर नाईन्टीन संघासह आपले नाव कमावले होते. त्यानंतर आयपीएल लिलावात त्याच्यावर तीन कोटींपेक्षा अधिकची बोली लागली. मात्र, चेन्नईने त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. मंगळवारीच झालेल्या आयपीएल रिटेन्शनमध्ये चेन्नईने त्याला आपल्या संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

(Rajwardhan Hangargekar Last Ball Six Maharashtra Beat Bengal In Vijay Hazare Trophy )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम
आयपीएलच्या दिग्गजांना ‘बाय-बाय’ करत सीएसकेने राखले आपले 18 ‘सुपर किंग्स’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---