---Advertisement---

रमीझ राजांनी टीम इंडियाला पुन्हा डिवचले! म्हणाले, “तुम्हाला वाईट वाटेल पण मी सांगतो…”

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 7:08 PM
Ramiz-Raja
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) हे सातत्याने चर्चेत असतात. भारतीय संघ व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यावर ते वारंवार टीका करतात. टी20 विश्वचषकावेळीही त्यांनी भारतीय संघावर टीका केलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी भारतीय क्रिकेट संघ व बीसीसीआयबाबत गरळ ओकली आहे.

रमीझ राजा हे पीसीबीचे अध्यक्ष झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाला सातत्याने निशाण्यावर घेत आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात त्यांनी भारतीय संघावर पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले,

‘आपल्या शेजाऱ्यांना वाईट वाटेल मात्र मी वस्तुस्थिती सांगतो. ज्या क्रिकेट मंडळाची अर्थव्यवस्था अब्जावधी रुपयांची आहे त्या मंडळाच्या क्रिकेट संघाला आम्ही एका वर्षात दोनदा हरवले.”

भारतीय संघाला पाकिस्तानने मागील वर्षी टी20 विश्वचषकात 10 गडी राखून पराभूत केलेले. त्यानंतर यावर्षी आशिया चषकाच्या सुपर फोरमध्येही भारतीय संघाला पाकिस्तानने पराभूत करण्याचा कारनामा केलेला. असे असले तरी भारतीय संघाने ही दोन वेळा पाकिस्तानला नमवले आहे. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केलेला. नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यातही भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत बरोबरी साधली होती.

टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात होते. भारताने ब गटातून अव्वल तर पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडने मात दिलेली. दुसरीकडे अंतिम फेरी प्रवेश केलेल्या पाकिस्तानला देखील इंग्लंडनेच पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला.

(Rameez Raja Controversial Statement On Team India)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं

दिग्गज इंग्लिश क्रिकेटपटू बनला बाप, लग्नाआधीच चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---