मुंबई । भारतीय क्रिकेट संघासाठी 1983 चा विश्वकरंडक हा टर्निंग पॉईंट ठरला. ज्यामुळे केवळ भारतीय संघाचा नव्हे तर देशातील क्रिकेटचा चेहरा बदलला. नुकतेच भारतीय संघाने ही भव्य स्पर्धा जिंकून 27 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या या विजयाची आठवण करून देत पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजाने 1983 च्या भारतीय संघाच्या विश्वचषक दौर्यातील मानधनाची पावती शेअर केली आहे. हे पाहिल्यावर हे स्पष्ट होते की, भारतीय संघाला किती कमी पैसे मिळाले तरीही त्याने चॅम्पियन होण्याचा पराक्रम दाखवला.
भारतीय संघाच्या सामन्यातील मानधनाची पावती सोशल मीडियावर शेअर करताना रमीझ राजाने मोठे विधान केले. यात 1983च्या विश्वचषकात भारतीय संघाला फक्त 2100 रुपये देण्यात आले होते
रमीझ राजाने लिहिले की, ”मला अजूनही आठवतेय की त्यावेळी किती पैसे मिळाले होते. आम्हाला 55 हजार रुपये दिले गेले.
म्हणजे पाकिस्तानला भारतापेक्षा 26 पट जास्त पैसा मिळाला. 1986-87 च्या भारतीय संघाच्या दौर्यासाठी आपल्याला ही रक्कम मिळाली. त्यामध्ये त्यांना 5 कसोटी आणि 6 एकदिवसीय मालिका खेळाव्या लागल्या.”
भारतीय संघाने 1983 च्या विश्वचषकात दोन वेळाचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा पराभव करत प्रथमच विजेतेपद जिंकले होते. या विश्वचषकात भारतीय संघाची विजेतेपदाच्या शर्यतीत गणना केली जात नव्हती, परंतु इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघाला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.
Had to reproduce this… will try to get a copy of what we got paid for the Indian tour in 86-87. I remember it to this date what I got: played 5 Tests and 6 ODI’s and got paid Rs 55000. pic.twitter.com/kbmGMkVGqE
— Ramiz Raja (@iramizraja) July 26, 2020
In ‘86, Pak Rs to US dollar parity would calculate Rs 55000 to around US$4600.
— Ramiz Raja (@iramizraja) July 26, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 140 धावांवर सर्वबाद झाला होता आणि 43 धावांनी विजयी झाला होता. या सामन्यात मदनलाल आणि अमरनाथने शानदार गोलंदाजी करत भारताकडून प्रत्येकी 3 गडी बाद केले होते. कपिल देव यांनी 8 सामन्यांत एकूण 303 धावा केल्या तर रॉजर बिन्नी यांनी सर्वाधिक18 बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–असा ऑलराऊंडर होणे नाही, माजी क्रिकेटर गौतम गंभीरचा या खेळाडूवर कौतूकाचा वर्षाव
–देशासाठी इतके वर्ष क्रिकेट खेळूनही माजी कर्णधार आज नोकरीच्या शोधात, घर चालवायलाही नाहीत पैसे
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघालाच यूएईत जिंकता आला नाही एकही सामना; पहा कोणी किती सामने जिंकलेत
येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा






