भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून यातील दोन सामने पाहुण्या इंग्लंड संघाने तर एक सामना यजमान भारताने जिंकला आहे. त्यामुळे १-२ अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
या मालिकेत भारताला फलंदाजांचे अपयश सातत्याने सतावते आहे. वरच्या फळीतील फलंदाजांसह खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीचे हुकामे एक्के असणारे हार्दिक पंड्या, रिषभ पंत सारखे फलंदाजही अपयशी ठरत आहेत. नुकतेच पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजाने यामागील कारणाचा उलगडा केला.
हार्दिकच्या अपयशामागील कारणाचा केला खुलासा
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने आपल्या याच कौशल्याचे प्रदर्शन मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळतांना केले होते. हाच फॉर्म तो भारतीय संघाकडूनही खेळतांना कायम राखेल अशी अपेक्षा होती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या आत्तापर्यंत पार पडलेल्या ३ सामन्यात दोन वेळा फलंदाज करताना २१ चेंडूत १९ आणि १५ चेंडूत १७ अशा दोन खेळ्या केल्या.
याम्गील कारणाबाबत बोलताना रमीझ राजा म्हणाले, “हार्दिक पंड्या आखूड टप्प्यांच्या चेंडूवर मोठे फटके मारू शकत नाही. आणि हीच गोष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे. इंग्लंडचे गोलंदाज देखील त्याला आखूड टप्प्याचेच चेंडू टाकत आहेत कारण त्याला तुम्ही खोल टप्प्यांचे चेंडू टाकू शकत नाही, ही बाब त्यांना माहिती आहे. त्यामुळे शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ वर ते गोलंदाजी करत आहे आणि त्यामुळे पंड्या अडचणीत सापडतो आहे.
याशिवाय इंग्लंडचे गोलंदाज भारताच्या टॉप ऑर्डर मधील फलंदाजांना लवकर बाद करून मधल्या फळीवर दबाव वाढवत आहेत. ज्यामुळे भारताला सामन्यावर पकड घेण्याची संधीच मिळत नाहिये, असे निरीक्षण देखील राजा यांनी यावेळी मांडले. आता आजच्या सामन्यात भारतीय संघ या उणिवांवर मात करू शकणार का, यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून असेल.
महत्वाच्या बातम्या:
चौथ्या सामन्यात रोहित-चहल यांच्या निशाण्यावर असतील हे मोठे विक्रम
शेर कभी बुढ़ा नहीं होता! सचिनच्या त्या षटकाराने चाहत्यांना आली २००३ विश्वचषकाची आठवण, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाचं वेळापत्रक गजबजलं! ऑक्टोबर महिन्यात मायदेशात होणार दोन टी२० मालिका






