पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सामना म्हटलं की चर्चा तर होतेच. या दोन देशांच्या राजकीय संबंधांचा क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या देशांमध्ये दोन किंवा चार वर्षांनी सामने होताना आता असतात, तेही आयसीसी स्पर्धांमध्ये. पण कदाचित आता हे सामने दरवर्षी पहायला मिळणार आहेत, कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार रमीझ राजा यांना चार देशांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका दरवर्षी आयोजित करायची आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि भारत हे संघसुद्धा सामाविष्ट असाणार आहेत.
रमीझ राजा यांनी मंगळवारी याबाबतचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर मांडणार असल्याचं म्हटलं आहे. तो प्रस्ताव जर मान्य झाला, तर चाहत्यांना दरवर्षी भारत- पाकिस्तान सामन्याचा पाहता घेता येणार आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, या मालिकेत भारत, पाकिस्तान सोबतच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी सुद्धा सहभाग घ्यावा, असे झाल्यास जो नफा होईल तो आयसीसीसोबतच भाग घेणाऱ्या देशांनीसुद्धा वाटून घ्यावा.
रमीझ राजाने ट्विटरवर असे लिहले आहे की, “नमस्कार मित्रांनो, मी भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांत दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सुपर मालिकेचा प्रस्ताव मांडेन. यात हे चार देश रोटेशनच्या आधारावर आयोजित केले जातील, त्याचे रिवेन्यू मॅाडेल वेगळे असेल. ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा वाटून घेतील.” त्यांचं हे ट्वीट चांगलच व्हायरल होतं आहे.
https://twitter.com/iramizraja/status/1480961596197384192
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ दरम्यान पाहायला मिळाला होता. यावेळी भारताचा पाकिस्तानने १० विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताचा विश्वचषकात पराभव केला होता. या दोन संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. हे दोन संघ केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोहलीसारखा फलंदाज मिळणे कसोटी क्रिकेटचे भाग्य” महिला इंग्लिश क्रिकेटपटूने गायले गुणगान
स्मिथचा ‘कार’तोड षटकार एकदा पाहाच, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
‘हे’ ५ अनकॅप्ड खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये करू शकतात पदार्पण, यादीत एक वेगवान गोलंदाजही सामील






