---Advertisement---

नको रे बाबा! ‘या’ गोलंदाजापुढे रनमशीन कोहलीलाही फुटायचा घाम, सर्वच फलंदाज होते त्रस्त

On: सोमवार, मे 31, 2021 9:39 PM
---Advertisement---

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडमध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. त्यासाठी सर्वच खेळाडूंना मुंबई येथे क्वांरटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ १८ ते २२ जून दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू क्वारंटाईनमध्ये राहून व्यायाम करत आहेत. या अंतिम सामन्यानंतर विराटसेना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे.

याच दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंस्टाग्रामवर सक्रिय दिसत आहे. विराटने शनिवारी इंस्टाग्रामवर एक लाइव्ह कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये त्याने चाहत्यांशी संवाद साधला होता.

या कार्यक्रमादरम्यान विराटच्या चाहत्याने त्याला प्रश्न केला की, ‘भूतकाळात असा कोणता गोलंदाज होता ज्याने तुझ्यासाठी सर्वात जास्त अडचणी निर्माण केल्या होत्या?’ याचे उत्तर देताना विराटने अशा एका गोलंदाजाचे नाव घेतले, ज्याने फक्त विराट नाही तर सर्वच फलंदाजांना अडचणीत टाकले होते.

मागील काही दशकात सकलेन मुश्ताक, कर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोस, वकार युनिस, मुथैया मुरलीधरण, शेन वॉर्न, जवागल श्रीनाथ, मायकल होल्डिंग, असे काही दिग्गज गोलंदाज फलंदाजांसाठी सर्वात जास्त अडचणी निर्माण करत असतं. परंतु विराटने याचे उत्तर सांगत असताना पाकिस्तानचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार वसीम अकरम यांचे नाव घेतले.

Photo Courtesy: Instagram/Virat Kohli

विराट कोहली आणि त्याची सेना सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपदाचा हा अंतिम सामना भारतीय संघासाठी पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद ट्रॉफी नावावर एक सुवर्णसंधी आहे. त्याच बरोबर विराटलाही आपल्या नेतृत्वाखाली पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवता येणार आहे.

वसीम अकरमची कारकिर्द
वसीम अकरम यांनी कसोटी सामन्यात 414 तर एकदिवसीय सामन्यात 502 बळी घेतले आहेत. वसीम अकरम यांनी गोलंदाजी करताना चेंडू वेगाने तर कधी रिव्हर्स स्विंग करून फलंदाजासाठी अडचणी निर्माण केल्या होत्या. ते एक उत्कृष्ट फलंदाजसुद्धा होते. त्यांनी अनेक विक्रम रचले होते. त्यांनी कसोटी सामन्यात 2898 धावा तर एकदिवसीय सामन्यात 3717 धावा काढल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

खराब फॉर्ममध्ये असलेल्या जड्डूला धोनीकडून मिळाला ‘हा’ गुरुमंत्र, मग चोप चोपल्या धावा

तू कसोटीसाठी सज्ज आहेस; पुजाराच्या शब्दांनी भारावला होता ‘हा’ ३२७ बळी घेणारा गोलंदाज

तब्बल १८ शतके करणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला करायची आहे द्रविड अन् लक्ष्मणसोबत फलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---