बेंगलोर। भारतीय हॉकीने महिला संघाच्या कर्णधारपदी राणी रामपालची तर पुरूष संघाच्या कर्णधारपदी पीआर श्रीजेशची या वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहेत.
सध्या महिला संघाचे नेतृत्व करणारी राणी आणि श्रीजेश पाठीच्या दुखापतीतून बरा होऊन कर्णधार पदावर परत आले आहेत. राणी यावर्षी जुलैमध्ये लंडंन येथे होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकात आणि जकार्तामधील 18व्या आशियाई स्पर्धेत नेतृत्व करणार आहे.
राणीने याआधी 2009च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवून दिले होते. तसेच तिला 2013 ज्युनियर विश्वचषकाचा “मालिकावीर” पुरस्कार देखील मिळाला आहे.
तिच्या नेतृत्वाखाली संघ 12व्या स्थानावरून 10व्या स्थानावर आला. यावर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत संघ उंपात्य फेरीत पोहचला होता.
श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारताचे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. तसेच रियो अॉलम्पिकमध्येही त्याने संघाचे नेतृत्व केले होते.
श्रीजेश 2017 च्या सुलतान अझलान चषकात गोलरक्षण करताना उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याने यावर्षी झालेल्या चार देशांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत न्युझीलंड विरूध्द चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानावर होता.
” ते दोघेही उत्कृष्ठ खेळाडू आहेत. त्यांच्यात अनुभवाची कसलीच कमतरता नसल्याने त्यांनी आत्तापर्यंत संघांचे नेतृत्व चांगल्याप्रकारे केले आहे. यावर्षी विश्वचषक आणि आशियाई स्पर्धा असल्याने यामध्ये राणी यामध्ये महत्वाची भुमिका निभावू शकते,” असे भारतीय हॉकीचे जनरल सचिव मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले.
” या वर्षात होणाऱ्या स्पर्धांसाठी एकच कर्णधार या घोषणे मागची कल्पना अशी आहे की यामुळे संघामध्ये स्थिरता येईल,” असेही ते म्हणाले.
” राष्ट्रकुल स्पर्धेतील निकाल आम्हाला अनपेक्षित असा होता, तरीही त्या स्पर्धेतील अनुभव आम्हाला पुढील स्पर्धांमध्ये उपयुक्त ठरेल. त्याच बरोबर आमचा प्रशिक्षण देणारा कर्मचारी वर्गाचा आमच्या खेळण्याच्या पद्धतीवर विश्वास असला, तरी आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे,” असे भारताचे प्रशिक्षक जारेड मारिज्ने यावेळी म्हणाले.