---Advertisement---

केवळ भारत-बांगलादेशच्या खेळाडूंनीच नाही तर ‘या’ व्यक्तीनेही केलाय खास पराक्रम!

On: सोमवार, नोव्हेंबर 4, 2019 12:01 PM
---Advertisement---

दिल्ली। रविवारी(3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीही घेतली.

विशेष म्हणजे हा सामना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील 1000 वा सामना होता. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. याबरोबरच हा सामना सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासाठीही खास ठरला.

त्यांचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून हा 100 वा सामना होता. त्यामुळे श्रीलंकेचे मदुगले हे 100 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सामनाधिकारी म्हणून भूमिका निभावणारे केवळ दुसरेच सामनाधिकारी ठरले आहेत.

याआधी न्यूझीलंडचे जेफ क्रो यांनी 119 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्यांमध्ये भारताचे जवागल श्रीनाथ पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 79 टी20 सामन्यात सामनाधिकारी म्हणून भूमिका बजावली आहे.

सामनाधिकारी म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने – 

119 – जेफ क्रो (न्यूझीलंड)

100 – रंजन मदुगले (श्रीलंका)

98 – ख्रिस ब्रॉड (इंग्लंड)

81 – अँडी पायक्रॉफ्ट (झिम्बाब्वे)

79 – जवागल श्रीनाथ (भारत)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---