रणजी ट्रॉफी २०२२च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने ऐल्लोर, बंगळुरूमध्ये सुरू आहेत. यामध्ये केएनसीए क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेशने कर्नाटकचा पाच विकेट्सने पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. हा सामना कर्नाटकने जरी गमावला असला तरी अष्टपैलू कृष्णप्पा गौतमच्या त्या एका षटकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
नाणेफेक जिंकत उत्तरप्रदेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत त्यांनी कर्नाटकच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. रवीकुमार समर्थ आणि श्रेयस गोपाल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांचा पहिला डाव २५३ धावांतच संपुष्टात आला.
फलंदाजांच्या विकेट्स जात असताना गौतमने उत्तम फलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने शिवम मवीच्या गोलंदाजीवर ‘नो लूक सिक्स’ मारत सगळ्यांनाच हैराण केले. हा शॉट पाहुन समालोचकही चकित झाले आहेत.
गौतमच्या त्या षटकाराचा व्हिडीओ बीसीसीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात १३ चेंडूत १२ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना दोन्ही डावात मिळून ३ विकेट्स घेतले आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या सामन्यात पहिल्या डावात कर्नाटकचे मयांक अग्रवाल, करूण नायर आणि मनिष पांडे हे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. उत्तर प्रदेशकडून मवी आणि सौरभ कुमार यांनी फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्यांनी अनुक्रमे ३ आणि ४ विकेट्स घेतल्या.
उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळतच झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकरच बाद झाले. यावेळी प्रियम गर्ग आणि रिंकू सिंग यांचा सामना सांभाळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांचे सहा फलंदाज एकेरी धाव करताच तंबूत परतल्याने त्यांचा पहिला डाव सर्वबाद १५५ असा राहिला.
दुसऱ्या डावाची सुरूवात झाल्यावर आघाडीवर असलेल्या कर्नाटक संघाची सुरूवात अतिशय खराब झाली. त्यांचा संघ ११४ धावातच गारद झाला. तर उत्तर प्रदेशने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. यावेळी कर्णधार करण शर्माने नाबाद ९३ धावा आणि गर्गने ५२ धावा केल्या.
या रणजी स्पर्धेतील (Ranji Trophy) मुंबई विरुद्ध उत्तराखंड, बंगाल विरुद्ध झारखंड आणि पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश यांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने अजून सुरू आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात! रणजी पदार्पणात मुंबईकर फलंदाजाचे द्विशतक, प्रशिक्षकांच्या समोर मोडला त्यांचाच रेकॉर्ड
क्या बात है! आरसीबीचे २ धुरंधर गाजवतायत रणजी ट्रॉफीचं मैदान, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक