आजपासून(24 जानेवारी) रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेची उपांत्य फेरी सुरु झाली आहे. या फेरीत कर्नाटक संघाकडून ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला मयंक अगरवाल खेळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या छोट्या दुखापतीनंतर तो आज सौराष्ट्र विरुद्ध मैदानात उतरला आहे. मात्र त्याला आज दोनच धावा करण्यात यश आले.
मयंक ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका सुरु होण्याआधी भारतात परतला होता. त्याला आंगठ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला भारताच्या वनडे मालिकेत स्थान मिळवण्याच्या संधीलाही मुकावे लागले.
त्याच्या या दुखापतीमुळे निवड समीतीने त्याला न्यूझीलंड विरुद्ध संधी न देता शुभमन गिलला संधी दिली. पण असे असले तरी मयंकच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
मयंकने मेलबर्न येथे पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 76 धावांची अर्धशतकी खेळी करत सर्वांना त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. त्याने या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 3 डावात 195 धावा केल्या होत्या.
त्याला या मालिकेत दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ ऐवजी जागा देण्यात आली होती. शॉला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती.
सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मयंक बरोबरच कर्नाटकचा कर्णधार मनिष पांडेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच सौराष्ट्र संघातील चेतेश्वर पुजारा याची कामगिरीही त्यांच्या संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच विनय कुमार, करुण नायर आणि जयदेव उनाडकट हे देखील या सामन्यात त्यांची कामगिरी उंचावून लक्ष वेधू शकतात.
या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली आहे. पहिल्या सत्रात त्यांनी 4 बाद 128 धावा केल्या आहेत.
त्यांनी पहिल्या चार विकेट्स या 30 धावांवरच गमावल्या होत्या. पण त्यानंतर मनिष पांडे आणि श्रेयस गोपालने त्यांचा डाव सांभाळला आहे. पांडे 56 धावांवर आणि श्रेयस 46 धावांवर नाबाद खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज खेळाडू म्हणतो, रिषभ पंत विश्वचषकात नकोच
–NZvsIND: टी२० मालिकेबरोबरच शेवटचे दोन वनडेही खेळणार नाही विराट कोहली, जाणून घ्या कारण
–भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत हा प्रतिभावान खेळाडू १०० टक्के करणार पदार्पण