भारतीय संघाचा विस्फोटक युवा फलंदाज ईशान किशन याची बॅट आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो किंवा देशांतर्गत स्पर्धा असो, सर्वत्र तळपताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 24 वर्षीय ईशानने शानदार द्विशतक ठोकत संघाला विजयी केले होते. आता 5 दिवसांनंतर रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेच्या एका सामन्यातही त्याने शानदार शतक झळकावले आहे.
ईशान किशन (Ishan Kishan) याने ही खास कामगिरी झारखंड विरुद्ध केरळ (Jharkhand vs Kerala) संघातील सामन्यादरम्यान केली. झारखंडकडून खेळताना ईशानने ठोकलेल्या या शतकामुळे त्याच्यावर कौतुकाचाही वर्षाव होत आहे. खरं तर, या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या नेतृत्वातील केरळ संघाने पहिल्या डावात सर्वबाद 475 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना झारखंड संघाच्या पहिल्या चार विकेट्स झटपट पडल्या होत्या. त्यानंतर ईशानने शतक झळकावत धावसंख्या 300 धावांच्या पार पोहोचवली.
रांची येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी झारखंडने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावत 87 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सौरभ तिवारी 13 आणि विराट सिंग 18 धावांवर नाबाद होते. कर्णधार विराट गुरुवारी (दि. 15 डिसेंबर) काही खास कामगिरी करू शकला नाही. तसेच, 30 धावांवर तंबूत गेला. संघ 114 धावांवर 4 विकेट्स गमावल्यानंतर अडचणीत होता. त्यानंतर ईशानने आक्रमक फलंदाजी करत सौरभसोबत 5व्या विकेटसाठी आतापर्यंत नाबाद 199 धावांची भागीदारी रचली आहे. झारखंड संघाने 99 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावत 316 धावा केल्या. यादरम्यान ईशान 191 चेंडूत 125 धावांवर खेळत आहे. त्यात त्याने 7 षटकार आणि 9 चौकारही मारले आहेत. दुसरीकडे, सौरभ 228 चेंडूत 97 धावांवर खेळत आहे.
Ishan 100 runs in 166 balls (8×4, 5×6) Jharkhand 279/4 #JHAvKER #RanjiTrophy Scorecard:https://t.co/TpcN481lIn
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 15, 2022
प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सहावे शतक
ईशानचे हे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सहावे शतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने 46 सामन्यात 78 डावांमध्ये 38च्या सरासरीने 2805 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 5 शतके आणि 16 अर्धशतके ठोकली होती. 273 धावांची ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मात्र, आतापरयंत त्याला भारताच्या कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाहीये. (ranji trophy 2022-23 cricketer ishan kishan hits century for jharkhand against kerala team india bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमेश यादव उडवला बांगलादेशी फलंदाजाचा त्रिफळा, व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहलीच्या विकेटबाबत तैजुल इस्लामचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याची विकेट घेणे माझ्या कारकिर्दीत…’