सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा म्हणून रणजी ट्रॉफीला ओळखले जाते. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवतात. या स्पर्धेत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या भारतीय खेळाडूंसोबतही खेळण्याची संधी मिळते. सध्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या सहकाऱ्याने दमदार फलंदाजी केली. तसेच, नवव्या क्रमांकावर उतरत शतक झळकावले.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतील दुसरा उपांत्यपूर्व सामना सौराष्ट्र विरुद्ध पंजाब (Saurashtra vs Punjab) संघात खेळला जात आहे. या सामन्यात सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांनी पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 303 धावांचा डोंगर उभा केला. यावेळी सौराष्ट्रकडून भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा मित्र आणि संघसहकारी पार्थ भुट (Parth Bhut) याने शानदार शतक झळकावले. त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 155 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याने 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 111 धावा कुटल्या. विशेष म्हणजे, हे त्याचं पहिलंच शतक होतं.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1620375054843514881
सौराष्ट्र संघाकडून सलामीला उतरलेल्या हार्विक देसाई याला 4 चेंडू खेळून भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला. त्याच्यासोबत सलामीला उतरलेल्या स्नेल पटेल याने अर्धशतकी खेळी साकारत 70 धावा कुटल्या. याव्यतिरिक्त पार्थला सोडले, तर एकाही खेळाडूला 30 धावांचा आकडा पार करता आला नाही. सौराष्ट्र संघाला कठीण काळात पार्थने शतक झळकावून समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. पार्थ भुट याच्याबद्दल बोलायचं झालं, तर तो गुजरातचा राहणारा आहे. तो सौराष्ट्र संघासाठी अष्टपैलू म्हणून खेळतो.
दुसरीकडे, पंजाब संघाच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी पहिल्या डावात 68 षटकापर्यंत 276 धावा कुटल्या आहेत. तसेच, त्यांनी 3 विकेट्सही गमावल्या आहेत. पंजाबकडून प्रभसिमरण सिंग याने शतक झळकावले आहे. त्याने 158 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 126 धावा कुटल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त नमन धीर हादेखील 131 धावा करून बाद झाला. (ranji trophy 2022-23 saurashtra vs punjab all rounder ravindra jadeja friend parth bhut hits century against punjab)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर
महिला प्रीमिअर लीग: मितालीनंतर झूलन गोस्वामी बनली ‘या’ संघाची गोलंदाजी प्रशिक्षक?