रणजी करंडक स्पर्धेच्या (Ranji Trophy 2022) एलिट गटाच्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीला गुरुवारी (३ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अनेक खेळाडूंनी शतके लगवली. परंतु कर्नाटक आणि पुद्दुचेरी सामन्यात शतक लगावणाऱ्या आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून शानदार खेळी करणारा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) रणजी करंडक स्पर्धेत आपली कामगिरी दाखवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) खेळीने निराशा झाली आहे.
या सामन्यात देवदत्तने आपले रणजीतील पहिले शानदार शतक झळकवले आहे. पडिक्कलने २७७ चेंडूत १६१ धावांची खेळी करत नाबाद राहिला. त्याने २० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ चेंडूत ९२ धावा कुटल्या. कर्नाटकने पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २९३ धावा केल्या. गुरुवारी (०३ मार्च) गोवा आणि सौराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने निराश केले आहे. त्याने गोव्याविरुद्ध फक्त २८ धावा करत तंबू गाठला.
कर्नाटक आणि पुद्दुचेरीच्या सामन्यात पडिक्कलबरोबरच कर्णधार मनीष पांडे २१ धावा करत नाबाद राहिला. नाणेफेकीत पराभूत झाल्यानंतर कर्नाटक संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. १९ व्या षटकापर्यंत सलामीवीर फलंदाज रवीकुमार समर्थ ११ धावा करून, तर करुण नायर ६ धावा करून तंबूत परतले होते. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कृष्णमूर्ती सिद्धार्थने ८५ धावांची खेळा खेळत देवदत्त पडिक्कलला साथ दिली. या दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या विकेटसाठी २२३ धावांची भागीदारी केली. यावेळी पडिक्कलने १६५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यातच आता गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सौराष्ट्र आणि गोवा यांच्या सामन्यात सौराष्ट्र संघाने पहिल्या दिवशी गोव्याविरुद्ध ७ गडी गमावत ३४३ धावा केल्या आहेत. सौराष्ट्र संघाकडून खेळताना चिराज जानीने शानदार शतक लगावत १४० धावांची खेळी केली. पुजाराने ४ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या आणि प्रभुदेसाईच्या चेंडूवर तो बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम