Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफी 2024 च्या तिसऱ्या फेरीला कालपासून (19 जानेवारी) सुरुवात झाली. या फेरीतही एकूण 19 सामने खेळवले जात असून त्यात अ, ब, क, ड गटातील प्रत्येकी चार आणि प्लेट गटातील तीन सामने खेळवण्यात आले. प्रमुख खेळाडूंमध्ये विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने जबरदस्त गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे फ्लॉप ठरला आणि शून्यावर बाद झाला, पण शिवम दुबेने शानदार अर्धशतक झळकावले. हैदराबादच्या तिलक वर्मानेही तुफानी खेळी केली. (ranji trophy 2023 24 update umesh yadav outstanding bowling tilak varma 70 runs rohit sharma 5 wickets)
रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवसाच्या राऊंड अपवर एक नजर टाकूया:
एलिट, ग्रुप ए
सौराष्ट्रने विदर्भाविरुद्ध 206 धावा केल्या, त्यात चेतेश्वर पुजाराच्या 43 धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात विदर्भाने 26 धावांत 4 विकेट्स गमावल्या आहेत.
झारखंडने सर्व्हिसेसविरुद्ध पहिल्या डावात 4 विकेट्स गमावून 195 धावा केल्या होत्या. कर्णधार विराट सिंग 85 आणि कुमार कुशाग्र नाबाद 69 धावांवर खेळत आहेत.
महाराष्ट्राने राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात 182 धावा केल्या, कर्णधार केदार जाधवने 42 धावांची खेळी केली. तर कुकणा अजय सिंगने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 2 विकेट्स गमावून 110 धावसंख्या उभारली होती. करण लांबा 45 आणि दीपक हुडा 36 धावांवर नाबाद होते.
हरियाणाने मणिपूरविरुद्ध पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 391 धावा केल्या होत्या, हिमांशू राणा 193 धावांवर नाबाद होता.
एलिट, गट ब
आसामविरुद्ध आंध्रचा पहिला डाव 188 धावांवर आटोपला, ज्यात राहुल सिंगने 6 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तराच्या डावात आसामने बिनबाद 43 धावा केल्या होत्या.
बंगालने छत्तीसगडविरुद्ध 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. अनुस्तुप मजुमदार नाबाद 55 आणि अभिषेक पोरेल नाबाद 47 धावांवर खेळत होते.
केरळविरुद्ध मुंबईचा पहिला डाव 251 धावांवर संपला. शिवम दुबेने 51 धावांची तर तनुष कोटियनने 56 धावांची खेळी खेळली. तर श्रेयस गोपालने चार गडी बाद केले.
उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे होऊ शकला नाही.
एलिट, गट क
कर्नाटकविरुद्ध, गोव्याने पहिल्या दिवशी 8 विकेट्स गमावून 228 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये स्नेहल कौटणकरने सर्वाधिक 83 धावांचे योगदान दिले.
खराब प्रकाशामुळे पंजाब आणि त्रिपुरा यांच्यातील सामना होऊ शकला नाही.
तमिळनाडूने रेल्वेविरुद्धच्या पहिल्या डावात 5 विकेट्स गमावून 286 धावा केल्या, नारायण जगदीसनने नाबाद 155 धावा केल्या.
चंदीगड आणि गुजरात यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळही खराब प्रकाशामुळे झाला नाही.
एलिट, ग्रुप डी
जम्मू आणि काश्मीरविरुद्ध ओडिशाचा पहिला डाव 130 धावांवर आटोपला, रोहित शर्माने 5 आणि उमरान मलिकने 2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने 4 विकेट्स गमावून 45 अशी धावसंख्या उभारली होती.
दिल्लीविरुद्ध मध्य प्रदेशचा डाव 171 धावांवर आटोपला, त्यात हिमांशू चौहानने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 2 विकेट्स गमावून 86 अशी धावसंख्या उभारली होती. (Umesh Yadav’s dangerous bowling Tilak Verma’s scintillating innings, Rohit Sharma’s 5-wicket haul in Ranjith)
हेही वाचा
IND vs ENG: ‘भारताची फलंदाजी विराट-रोहितवर अवलंबून’, माजी इंग्लिश गोलंदाजाचं मोठं विधान
AUS vs WI 1st Test । लाईव्ह सामन्यातील स्मिथचं ‘हे’ काम नेहमी लक्षात राहणार! नवख्या खेळाडूसोबत काय केलं पाहाच