रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना आज (10 मार्च) मुंबई आणि विदर्भ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ही विजेतेपदाची लढाई जिंकून मुंबईच्या नजरा विक्रमी 42व्या विजेतेपदावर असतील, तर विदर्भाकडे तिसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा करण्याची संधी असेल. 2010 पासून संघाची कामगिरी थोडी खराब असली तरी मुंबई इंडियन्स सर्वाधिक वेळा रणजी करंडक विजेतेपद पटकावणाऱ्या संघांच्या यादीत खूप पुढे आहे. हा संघ गेल्या 14 वर्षांत दोनदा विजेता ठरला. तर विदर्भानंही या कालावधीत 2 विजेतेपदं जिंकली आहेत.
दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई आणि विदर्भानं आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून बाद फेरीत प्रवेश केला होता. उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाचा सामना कर्नाटकशी झाला. येथे त्यांनी 127 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर मुंबईनं उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याविरुद्ध विजय मिळवला.
उपांत्य फेरीत मुंबईचा सामना तामिळनाडूशी तर विदर्भाचा सामना मध्य प्रदेशाशी झाला. दोन्ही संघांनी आपापले सामने अनुक्रमे एक डाव, 70 धावांनी आणि 62 धावांनी जिंकले. आता अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत अपेक्षित आहे.
अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान मुंबईच्या संघाचे भाग नाहीत. सूर्यकुमार सध्या दुखापतग्रस्त आहे तर सरफराज इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा सदस्य होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई – पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे
विदर्भ – अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (कर्णधार/विकेटकीपर), आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकूर, आदित्य ठाकरे
रणजी ट्रॉफी 2023-24 अंतिम थेट सामना कोठे पाहायचा?
भारतातील दर्शक Sports18 स्पोर्ट्स चॅनलवर रणजी ट्रॉफी 2023-24 फायनलचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय तुम्ही JioCinema ॲप आणि वेबसाइटवर मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी 2023-24 फायनल पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
Video : बाबर आझमनं कॉपी केलं विराटचं सेलिब्रेशन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल