मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. आज सोमवार, 11 मार्च रोजी सामन्याचा दुसरा दिवस आहे.
मुंबईचा संघ पहिल्या दिवशी सर्वबाद केवळ 224 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, पहिल्या दिवसाअखेर विदर्भाची धावसंख्या 3 बाद 31 होती. आज दुसऱ्या दिवशी विदर्भाला चांगली सुरुवात करता आली नाही. विदर्भाचा संपूर्ण संघ अवघ्या 105 धावांत गडगडला. अशाप्रकारे मुंबईला पहिल्या डावात 117 धावांची आघाडी मिळाली आहे.
वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीनं मुंबईला दिवसातील पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं अथर्व तायडेला वैयक्तिक 23 धावांवर बाद केलं. यानंतर यश राठोड आणि आदित्य ठाकरे यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, लवकरच शम्स मुलानी यानं आदित्य ठाकरेला 19 धावांवर बाद केलं. त्यानंतर त्यांन अक्षय वाडकरलाही 5 धावांवर बाद केलं. अशाप्रकारे उपाहारापूर्वीच विदर्भ संघ अडचणीत आला होता.
शम्स मुलानी यांनं विदर्भाला सातवा धक्का दिला. त्यानं हर्ष दुबेला एका धावेवर बाद केलं. तनुष कोटियननं विदर्भाच्या संघाला पुढील दोन धक्के दिले. त्यानं प्रथम यश राठोड आणि नंतर यश ठाकूरला बाद केलं. मुंबईसाठी शेवटची विकेट तनुषनेचं मिळवली. त्यानं उमेश यादवला बाद करत विदर्भाला 105 धावांवर ऑलआउट केलं. मुंबई संघाला 117 धावांची आघाडी मिळाली आहे.
मुंबईनं पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना 224 धावा केल्या होत्या. मुंबईचे स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरले. दोघंही प्रत्येकी 7 धावा करून बाद झाले. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत शतक झळकावणाऱ्या शार्दुल ठाकूरनं अंतिम फेरीतही अर्धशतक झळकावलं. शार्दुलनं 75 धावा केल्या. तर पृथ्वी शॉच्या बॅटमधून 46 धावा निघाल्या. भूपेन लालवानीनं 37 धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी ३-३ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : हॅन्डल राहिलं हातात अन् बॅट निघाली फिरायला! तात्या’ पोलार्डसोबत हे काय झालं, पाहा व्हिडिओ
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!