---Advertisement---

Ranji Trophy 2024 । उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, एका क्लीकवर मिळवा सर्व अपडेट

Ranji Trophy
---Advertisement---

सध्या देशांतर्गत क्रिकेटची मानाची रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. भारतीय क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे महत्व असाधारन राहिले आहे. यावर्षीच्या रणजी हंगामातील साखळी फेरीचे सामने सोमवारी (19 फेब्रुवारी) संपले. चार एलिट गटांमधील पहिल्या दोन क्रमांकाचे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.

शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रणजी ट्रॉफी 2024 साठी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. आपल्या आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे संघ आपल्या होम ग्राऊंडवर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघांशी भिडणार आहेत. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भ संघाचा सामना कर्नाटक संघाशी होणार आहे. तसेच दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मध्ये प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे संघ आमने सामने असतील. तिसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई विरुद्ध बडोदा असा होणार आहे. तर तामिळनाडू आणि सौराष्ट्र संघात चौथा उपांत्यपूर्व सामना खेळला जाईल. तामिळनाडूने सात वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम आठ जागांमध्ये स्थान बनवले आहे.

रणजी ट्रॉफी 2024 चे उपांत्यपूर्व फेरीतील सामने –
पहिला उपांत्यपूर्व सामना – विदर्भ विरुद्ध कर्नाटक
दुसरा उपांत्यपूर्व सामना – मध्ये प्रदेश विरुद्ध आंद्र प्रदेश
तिसरा उपांत्यपूर्व सामना – मुंबई विरुद्ध बडोदा
चौथा उपांत्यपूर्व सामना – तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक शेअर केले गेले आहे. जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे सर्व सामने मोफत दाखवले जाणार आहे. तसेच टीव्हीवर या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी स्पोर्ट्स 18 च्या वेगवेगळे चॅनल पाहता येऊ शकतात.

दरम्यान, यावर्षी प्लेट डिविजनमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर हैदराबद आणि मेघालय संघ असणार आहेत. पुढच्या हणजी हंगामात या दोन संघांना एलिट गटात संधी दिली जाईल. दुसरीकडे मनिपूर आणि गोवा हे संघ एलिट गटातून प्लेट गटात सामील होती. मणिपूर आणि गोवा संघ यावर्षी रणझी हंगामाच्या गुणतालिकेत सर्वात सुमार प्रदर्शन करणारे संघ राहिले आहेत. 2 मार्च स्पर्धेचे दोन्ही उपांत्य सामने सुरू होती. तर अंतिम सामना 10 मार्चपासून खेळवला जाणार आहे. (Ranji Trophy 2024 Quarter Final Schedule)

महत्वाच्या बातम्या – 
रणजी ट्रॉफीवर टीका करण चुकीचं! निवृत्तीनंतर मनोज तिवारीवर बीसीसीआयची कडक कारवाई
मलिंगावर वरचढ ठरला वानिंदू हसरंगा! बनला अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---