भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेपूर्वी नाशिकच्या क्रीडाप्रेंमीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जे की येत्या 23 ते 26 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा संघात नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर रणजी सामना होणार आहे. या सामन्यात ऋतूराज गायकवाड व कृणाल पांड्यासारखे भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
क्रिकेटचा थरार अनुभवण्याची नाशिककरांची प्रतीक्षा आता संपली आहे. डिसेंबर 2018 नंतर तब्बल सात वर्षांनी नाशिकमध्ये रणजी स्पर्धेतील सामना खेळवला जाणार आहे. रणजी ट्रॅाफीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा बडोदाविरुद्ध सामना 23 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रंगणार आहे. नुकतेच नूतनीकरण झालेल्या या मैदानावर गोल्फ क्लबच्या लॉनवर बसून प्रेक्षकांना आता सामना बघता येईल.
23 जानेवारीपासूनच्या या नियोजित सामन्यात भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, महाराष्ट्राचा कर्णधार सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वडोदराचा कर्णधार अष्टपैलू कृणाल पांड्या हे नामवंत खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलु खेळाडू, महाराष्ट्र संघाचा महत्वाचा गोलंदाज सत्यजित बच्छाव हा देखील या संघात असू शकतो. युवा खेळाडू अर्शिन कुलकर्णी देखील खेळण्याची शक्यता आहे.
बडोदा क्रिकेट संघ : कृणाल पांड्या (कर्णधार), विष्णु सोलंकी (उपकर्णधार), प्रियांशु मोलिया, मितेश पटेल (विकेटकीपर), शिवालिक शर्मा, अतीत शेठ, आकाश सिंह, भार्गव भट्ट , राज लिम्बानी, लुकमान मेरिवाला, ज्योत्सनील सिंह, अक्षय मोरे, सुकीर्त पांडे, महेश पिथिया, अभिमन्युसिंह राजपूत, निनाद राठवा, शाश्वत रावत आणि लक्षित टोकसिया
महाराष्ट्र क्रिकेट संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), निखिल नाईक (उपकर्णधार आणि विकेटकीपर), अंकित बावने, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सत्यजीत बच्चाव, मंदार भंडारी, प्रदीप दाधे, रामकृष्ण घोष, हर्षल केट, अजीम काजी, मुर्तजा ट्रंकवाला, सिद्धेश वीर आणि हितेश वाळुंज
हेही वाचा-
रिंकू सिंगने पुन्हा मन जिंकले, वडिलांना दिला खास भेट, सोशल मीडियावर वाह.! वाह..!!
आखेर 12 वर्षांनंतर विराट कोहली रणजी ट्राॅफीत खेळणार, मुख्य प्रशिक्षकांनी केली पुष्टी
IND VS ENG; टी20 मालिकेपूर्वी संघाने घेतला मोठा निर्णय, हा खेळाडू यष्टीरक्षण करणार नाही