रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. अंत्यत चुरशीच्या या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद ३७४ धावा केल्या. यावेळी स्फोटक फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने या हंगामातील पाचवे शतक झळकावले आहे. यशस्वी जायसवालने देखील उत्तम सुरूवात करत ७८ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता मध्य प्रदेशचा संघ भक्कम स्थितीत दिसत आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता मुंबईच्या गोलंदाजांना विकेट्स घेण्यात अपयश येत होते. शुभम शर्मा आणि यश दुबे (Yash Dubey) यांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. दुबेचा हा पहिलाच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना आहे. यामध्ये त्याने शतक करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने केएल राहुलसारखे या शतकाचे सेलेब्रेशन केले आहे. जेवणाच्या ब्रेकपर्यंत मध्य प्रदेशने १ विकेट गमावत २२८ धावा केल्या होत्या.
शर्मा-दुबे यांनी सुरूवातीचे दोन तास सुरेख फलंदाजी करत १४४ धावांची भागीदारी रचली. चहापानानंतर खेळाला सुरूवात झाली असता यश दुबे १२० धावांवर खेळत होता. त्याने या हंगामात ६०० धावांचा टप्पा पार केला आहे. अखेर मुंबईला मोहित अवस्थीमार्फत यश हाती आले. त्याने शर्मा-दुबे भागीदारी तोडली. त्याने शर्माला ११६ धावांवर असताना हार्दिक तामोरेकरवी झेलबाद केले. शर्माचे हे या रणजी हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याच्या ७२ धावांच्या फरकाने शम्स मुलाणीने दुबेला १३३ धावांवर असताना बाद केले. पुन्हा एकदा तामोरेने झेल घेत विशेष कामगिरी केली आहे.
मध्य प्रदेशचा धावफलक हालता ठेवण्यासाठी रजत पाटीदार (Rajat Patidar) याने कर्णधार आदित्य श्रीवास्तव बरोबर सावध खेळाला सुरूवात केली. या सामन्यात मध्य प्रदेशकडून पाटीदार हा ६७ आणि श्रीवास्तव ११ धावा करत खेळपट्टीवर टिकून आहेत. मध्य प्रदेश मुंबईच्या सहा धावा मागे आहे. मध्य प्रदेशने तीन विकेट्स गमावत ३६८ धावा केल्या आहेत.
या हंगामात सरफराजने धांवांचा पाऊस पाडला असून त्याने ६ सामन्यात १३३ पेक्षा अधिक सरासरीने धावा करत ९३७ धावा केल्या आहेत. मुंबईचा अजून एक डाव शिल्लक आहे.
मध्य प्रदेशच्या हातात अजून ७ विकेट्स शिल्लक आहेत. मुंबई संघाचे ४२वे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगणार का? मुंबईचा संघ जोरदार पुनरागमन करणार की मध्य प्रदेश धावांचा डोंगर उभारत मुंबई संघाचे ४२वे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगणार का? विजेतेपदाच्या या शर्यतीत कोण जिंकणार हे पाहण्याचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ आहेत निवृत्तीनंतर अठराविश्व दारिद्रय पाहणारे पाच खेळाडू, यादी पाहून तुम्हीही हैरान व्हाल
बाद केल्यानंतर फलंदाजाच्या गळ्यात पडून केले सेलेब्रेशन, शमी पुजाराची मैत्री एकदा बघाच
टीम इंडियाला दिलासा, विराट-रोहितचा घाम काढणारा इंग्लिश गोलंदाज वनडे, टी२० मालिकेला मुकणार?