मानांकित स्पर्धा रणजी ट्रॉफीचा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. एम चिन्नास्वामी, बंगळुरू येथे सुरू असलेल्या अंत्यत या चुरशीच्या सामन्यात मध्य प्रदेश ४१व्या विजेत्या मुंबई संघावर जड पडताना दिसत आहे. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. त्याच्याबदल्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात ५३६ धावांचा डोंगर रचला आहे. आधी मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी मुंबईला त्रास दिला आता गोलंदाजही मागे राहिले नाही.
मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली झाली होती. मात्र कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासोबत यष्टीरक्षक-सलामीवर हार्दिक तामोरे फलंदाजीला आला. यशस्वी जायसवाल हा दुखापतग्रस्त असल्याने तो फलंदाजीला आला नाही. या सामन्यात शॉ आणि हार्दिकला जीवनदान मिळाले. याचा फायदा घेत त्यांनी ताबडतोब फलंदाजी केली.
हार्दिकला कुमार कार्तिकेयने त्रिफळातीच केले. त्याने ३२ चेंडूत २५ धावा केल्या. त्याच्या २० धावांच्या फरकाने शॉनेही लवकरच विकेट गमावली. तो बाद झाल्याने संघ अडचणीत आला आहे. त्याने ५२ चेंडूत ४४ धावा केल्या आहेत. मुंबईने ११३ धावांवर २ विकेट्स गमावल्या आहेत. मुंबईने ५च्या रनरेटने धावा करून सुद्धा त्यांच्याकडे फक्त ४९ धावांची आघाडी आहे.
या हंगामात सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुंबई संघाचाच बोलबाला आहे. मात्र शेवटच्या निर्णायक सामन्यात मध्य प्रदेशचा संघ दोन्ही विभागात वर्चस्व गाजवत आहे. सध्या खेळपट्टीवर अरमान जाफर ३० आणि सुवेद पारकर ९ धावा करत खेेळत आहेत.
तत्पूर्वी मध्य प्रदेशच्या तीन फलंदाजांनी पहिल्या डावात शतकी खेळी केली आहेत. त्यामध्ये सलामीवीर यश दुबे, मधल्या फळीतील शुभम शर्मा आणि रजत पाटीदार (Rajat Patidar) यांचा समावेश आहे. सारांश जैननेही ५७ धावा करत संघाची धावसंख्या वाढवली आहे. गौरव यादव याने मुंबईच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्या विकेटचाही समावेश आहे. दुसऱ्या डावात त्याने शॉची विकेट घेत मुंबईला धक्का दिला आहे.
That's Stumps on Day 4 of the @Paytm #RanjiTrophy #Final! #MPvMUM
Mumbai move to 113/2 & trail Madhya Pradesh by 49 runs.
We will be back tomorrow- for what promises to be a fascinating Day 5 of the summit clash.
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/lL3DFTBvEC
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 25, 2022
मध्य प्रदेशचे खेळाडू सगळया विभागात आघाडीवर असूून ते मुंबईच्या ४२वे विजेतेपद जिंंकण्यावर पाणी फेरणार अशी लक्षणे दिसत आहेत. मुंबईने पहिले दोन विकेट्स गमावले असले तरी त्यांचा स्टार फलंदाज सरफराज अजून फलंदाजीला यायचा बाकी आहे.
पाचव्या दिवसाच्या या सामन्यातील चार दिवस संपले असून यातून दोन निकाल लागण्याची शक्यता आहे. पहिले म्हणजे सामना अनिर्णीत राहिला तर मध्य प्रदेशने पहिल्या डावामध्ये आघाडी मिळवल्याने ते विजेते ठरतील. दुसरा निकाल, मध्य प्रदेशकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे. पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीपटूंना पुरक असणार आहे. त्यातच शम्स मुलाणीने या हंगामात ४२ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे मुंबई मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार
मितालीविनाही भारतीय संघ करतोय ‘राज’, दुसरी टी२० जिंकत मालिका नावावर
एका शॉटने अख्खा भारताला पराभवाच्या खाईत लोटणारा डग्लस मरिलीयर





