भारतीय क्रिकेटमध्येही पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे ६ खेळाडू आणि एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर मंगळवारी (०४ जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेत रणजी ट्रॉफी स्पर्धा स्थगित केली आहे. याबरोबरच कर्नल सीके नायडू ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी२० २०२१-२२, या देशांतर्गत स्पर्धाही पुढे ढकलल्या (Ranji Trophy Postponed) आहेत. आता बीसीसीआय अध्यक्षक सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी देशांतर्गत स्पर्धांच्या आयोजनासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
गांगुलींनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठी सर्व क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सर्वांना बीसीसीआय देशांतर्गत स्पर्धांच्या आयोजनासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सर्व राज्य संघांना आश्वस्त केले आहे की, ‘बोर्ड कोविड-१९ ची प्रकरणे वाढल्याने निर्माण झालेल्या परिस्थितींना नियंत्रणात आणल्यानंतर देशांतर्गत सत्र पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वकाही प्रयत्न करेल.’
वृत्त संस्था पीटीआयजवळ गांगुलींद्वारे राज्य असोसिएशनला लिहिले गेलेले ईमेल स्वरूपी पत्र आहे. यात लिहिले गेले आहे की, ‘तुम्हा सर्वांना माहिती आहे की, कोविड-१९ मुळे परिस्थिती बिघल्याकारणाने देशांतर्गत स्पर्धा थांबवाव्या लागल्या आहेत. कोविड-१९ ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि बऱ्याचशा संघांमध्ये बरेच पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. यामुळे खेळाडू, सामना अधिकारी आणि स्पर्धेशी संबंधित अन्य लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.’
तसेच पुढे बोलताना गांगुली म्हणाले की, ‘बीसीसीआय सर्वांना आश्वस्त करते की जसे कोविड-१९ ची स्थिती आटोक्यात येईल, तसे बोर्ड देशांतर्गत सत्र पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्वकाही करू. आम्ही या हंगामातील उरलेल्या सर्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. बोर्ड संशोधित योजनांसह तुमच्याकडे परत येईल. मी तुमचा सहयोग आणि परिस्थितींना समजून घेण्यासाठी तुमचा आभारी आहे. सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सुरक्षित व स्वस्थ राहा.’
महत्त्वाच्या बातम्या-
‘फॉर्म तात्पुरता, पण दर्जा कायम’, चेतेश्वर पुजाराचे टीकाकारांना चोख उत्तर
यजमान ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत फ्रंटफूटवर; पुनरागमनात ख्वाजाचे दणदणीत शतक
हेही पाहा-






