---Advertisement---

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत या संघाने केला पहिल्यांदाच प्रवेश

On: शुक्रवार, जानेवारी 18, 2019 9:16 AM
---Advertisement---

वयानंद। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेमध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात केरळने माजी विजेता गुजरातवर 113 धावांनी मात करत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. तसेच या हंगामात उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघही ठरला आहे.

रणजीच्या मागील हंगामात केरळ उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता. तर 1994-95च्या हंगामात ते पहिल्यांदा रणजी ट्रॉफीसाठी पात्र ठरले होते.

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी केरळला पहिल्या डावात 185 धावांवरच रोखले. मात्र गुजरातच्या फलंदाजांना केरळच्या गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडले होते. यावेळी कर्णधार पार्थिव पटेलने सर्वाधिक 43 धावा केल्याने गुजरातला पहिल्या डावात 162 धावा करता आल्या.

दुसऱ्या डावातही गुजरातच्या गोलंदाजांनी केरळच्या सलामीवीरांना लवकरच तंबूत पाठवले. मात्र एस जोसेफच्या अर्धशतकाच्या जोरावर केरळला 171 धावा करता आल्या. तर नंतर फलंदाजीला आलेल्या गुजरातच्या फलंदाजांनी बसील थंपी समोर शरणागती पत्करली. त्याने या डावात पाच विकेट्स घेतल्या. यामुळे गुजरातचा संघ 81 धावांवरच गारद झाला.

थंपीने या सामन्यात एकूण सात विकेट्स पटकावल्या. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या-

टॉप १०: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वनडे सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष

किंग कोहली करणार या भारतीय कर्णधाराबरोबर डान्स…

बऱ्याच काळानंतर सचिन तेंडुलकरने केले एमएस धोनीचे असे तोंडभरुन कौतुक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment