मुंबई। सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत काल मुंबई विरुद्ध तामिळनाडू संघातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईच्या श्रेयश अय्यर या फलंदाजाने शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने सचिनच्या एका डावात मुंबईकर फलंदाज म्हणून सर्वात जास्त षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
श्रेयशने १२४ चेंडूत १३८ धावांची आक्रमक खेळी करताना ९ षटकार ठोकले. याआधी सचिन तेंडुलकरने एका डावात ९ षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. श्रेयसने ही कामगिरी सामन्याच्या दुसऱ्या डावात केली. त्याचबरोबर संघातील सहकारी अखिल हेरवाडकरनेही १३२ धावा करत शतक केले.
एका डावात मुंबईकडून सार्वधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८५मध्ये १३ षटकार मारले होते तर सचिनने १९९६मध्ये एकाच डावात ९ षटकार मारले होते.
भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने तमिळनाडू संघाकडून खेळताना पहिल्या डावात ३ बळी मिळवले होते परंतु त्याला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही. तर फलंदाज बाबा इंद्रजित याने तामिळनाडू संघासाठी उपयोही १५२ धावांची खेळी केली होती.
मुंबईने पहिल्या डावात सर्वबाद ३७४ धावा केल्या होत्या तर तामिळनाडूने सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मुंबईची फलंदाजी चांगलीच बहरली त्यांनी ५ बाद ३७१ धावा केल्या परंतु पहिल्या डावातील आघाडीमुळे तामिळनाडूला ३ गुण देण्यात आले.