Ranji Trophy : भारताचा विकेटकिपर इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तसेच बीसीसीआयने देखील त्याच्या या निर्णयाला समर्थन दिलं होतं. मात्र बराचकाळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. राहुल द्रविडने देखील त्याला आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फिटनेस सिद्ध करावा त्यानंतर निवडीसाठी विचार होईल असे स्पष्ट संकेत दिले होते.
याबरोबरच, इशान किशनने बीसीसीआयच्या या आदेशाकडे पुन्हा एकदा कानाडोळा केलाय. झारखंडकडून खेळणाऱ्या इशान किशनने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या फेरीतील सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इशान किशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इशान किशनचं नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तसेच दीपक चहर आणि श्रेयस अय्यर देखील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये त्यांच्या संघाचा भाग झाले नाहीत. मात्र, अय्यर यांना कंबर आणि मांडीचा त्रास आहे. तर या तीन खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या संबंधित राज्य संघाकडून खेळण्यास सांगण्यात आले होते. इशानच्या अनुपस्थितीत कुमार कुशाग्र झारखंडच्या यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. तसेच सहा सामन्यांत केवळ एका विजयाने १० गुण मिळविणारा झारखंड अंतिम फेरीत घरच्या मैदानावर राजस्थान या संघाशी खेळत आहे.
तसेच, इशान किशन किरण मोरे अकॅडमीत सराव करतोय यावरून तो फिट असल्याचं बोललं जात आहे. त्याने यापूर्वी मानसिक थकव्याचं कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक घेतला होता. मात्र त्याचा रणजी न खेळण्याचा निर्णय हा वैयक्तिक कारणाने घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याची कृती ही बीसीसीआयच्या आदेशाविरूद्ध आहे. त्यामुळे याचा त्याच्या कारकिर्दीवर आणि टीम इंडियातील निवडीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी निवडसमितीने ध्रुव जुरेल या युवा विकेटकिपर फलंदाजाला संधी दिली आहे. त्याने पहिल्याच सामन्यातच 46 धावांची खेळी करत सर्वांना प्रभावित केलं आहे. ऋषभ पंत फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो संघात आल्यानंतर तोच पहिली पसंती असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy : भारतीय कसोटी संघात स्थान न मिळाल्यामुळे ‘या’ खेळाडूने रणजी ट्रॉफी दरम्यान घेतली निवृत्ती!
- राजकोट कसोटीत अश्विन अन्नाचा महाविक्रम! ठरला ‘ही’ मोठी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय