---Advertisement---

रणजी ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशच्या संभाव्य संघाची घोषणा; सुरेश रैनाला मात्र स्थान नाही

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 11:06 PM
---Advertisement---

१० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेसह भारतातील देशांतर्गत स्पर्धांचा नवा मोसमही सुरु होईल. नुकतेच उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे संघासाठीही आपला ३० जणांचा संघ जाहीर केला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अनुभवी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचे या यादीत नाव नाही.

रैना व्यतिरिक्त मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा देखील या संघात समावेश केला गेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गरज भासल्यास या दोघांनाही संघात समाविष्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या संघात कोरोनाची लागण झालेल्या अलमस शौकतचे नाव देखील सामील आहे.

सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेसाठी रैना, भुवनेश्वर उत्तर प्रदेश संघात –

जरी रैना आणि भुवनेश्वरला रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संभाव्य संघात स्थान मिळाले नसले तरी हे दोघेही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संघाचे प्रतिनिधित्व करतील. तर या स्पर्धेत उत्तर प्रदेशचे कर्णधारपद २० वर्षीय युवा प्रियम गर्गकडे सोपवण्यात आले आहे.

फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे, त्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. तसेच आयपीएलच्या लिलावाच्या दृष्टीने देखील या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल. कारण या स्पर्धेनंतर काहीदिवसातच आयपीएल २०२१ साठी लिलाव होण्याची दाट शक्यता आहे.

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशचा संभाव्य संघ-

प्रियम गर्ग, रिंकू सिंग, करन शर्मा, अक्षदीप नाथ, मोहम्मद सैफ, अलमस शौकत, समीर चौधरी, समीर रिजवी, माधव कौशिक, सत्यम दीक्षित, हरदीप सिंग, राहुल रावत, आर्यन जुयाल, उपेंद्र यादव, अंकित राजपूत, शिवम मावी, मोहसीन खान, आकीब खान, योगेंद्र दोयला, यश दयाल, सुनील कुमार, जसमेर धनकर, सौरभ कुमार, शानू सैनी, जीशान अन्सारी, ध्रुव चंद जुरेल, शुभम चौबे, अभिषेक गोस्वामी, पार्थ मिश्रा, मोहम्मद जावेद.

महत्वाच्या बातम्या:

20 वर्षांच्या तरुणाप्रमाणे मजबूत आहे सौरव गांगुलींच हृदय, उपचार करणाऱ्या डॉक्टर शेट्टींची प्रतिक्रिया

शार्दूल ठाकूरला तिसर्‍या कसोटीत संघात स्थान द्यावे, माजी खेळाडूंनी मांडले मत 

आयएसएल २०२० : बेंगळुरूला गारद करीत मुंबई सिटीची आघाडीवर मुसंडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---