बीसीसीआय अध्यक्ष व भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली हे मागील काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.2 जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान गांगुली यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. एंजियोप्लास्टी केल्यानंतर ते पूर्णतः स्वस्थ झाले असून येत्या बुधवारी आपल्या घरी जाऊ शकतात. सौरव गांगुलींवर उपचार करत असलेले डॉक्टर शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली की, गांगुलींचे हृदय हे 20 वर्षाच्या युवकाप्रमाणे मजबूत आहे.
डॉक्टर शेट्टी म्हणाले, “गांगुलींना कोणतीही मोठी समस्या नाही. हे सामान्य लक्षण असून जे प्रत्येक भारतीयाला केव्हातरी होऊ शकते. गांगुलींना कोरोनरी धमणी मध्ये समस्या असून जी फार सामान्य आहे. गांगुली योग्य वेळी योग्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आल्याने त्यांना आता कुठलीही समस्या नाही.”
गांगुलींना 2 तारखेला दुपारी एकच्या दरम्यान छातीमध्ये वेदना जाणवत होत्या. त्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. गांगुलींवर सर्व प्रकारचे योग्य उपचार झाले असून लवकरच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.गांगुलीच्या उत्तम प्रकृतीसाठी संपूर्ण देशवासीयांनी प्रार्थना केली होती. आता गांगुलींच्या उत्तम प्रकृतीची बातमी समोर येत असल्यामुळे, संपूर्ण भारतभर आनंद व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका
SA vs SL : सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, मी स्टीव्ह स्मिथला कोचिंग करत नाही, कारण