---Advertisement---

‘शांत राहा आणि आनंद घ्या’, पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यापूर्वी राशिद खानची चाहत्यांना विनंती

---Advertisement---

टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सामना पार पडणार आहे. या दोन्ही संघांमध्ये नेहमीच चांगला संघर्ष पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांचे चाहते क्रिकेटसाठी वेडे आहेत. अनेकदा दोन्ही संघांचे चाहते एकमेकांसोबत भिडले आहेत. एकदा जर या दोन्ही संघाच्या चाहत्यांचा वाद सुरु झाला, तर तो नियंत्रणीत करणे खूप कठीण होऊन बसते. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान संघाचा दिग्गज खेळाडू राशिद खानने सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ यापूर्वी २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात आमने-सामने आले होते. हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला गेला होता. यामध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तनला पराभूत केले होते. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघाच्या चाहत्यांमधील वातावरण तापले होते. सामन्यानंतर स्टेडियमच्या आतमध्ये आणि बाहेर चाहते एकमेकांशी भिडले होते.

राशिद खानने शुक्रवारच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना सल्ला दिला आहे की, पाकिस्तानविरुद्धचा सामना नेहमीच अप्रतिम राहिला आहे. पण हे देखील लक्षात ठेवा की, याला फक्त खेळाप्रमाणेच घेतले पाहिजे. शांत राहा. तसेच खेळाचा आनंद घ्या. जे काही होत आहे, त्याविषयी आम्ही विचार करत नाही. मागे काय झाले होते, आम्ही त्याविषयी देखील विचार करत नाही. ही सगळी अशी परिस्थिती आहे, जी आपल्या हातात नाही, तसेच आपल्या नियंत्रणातही नाही.

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघांचे यूएईमधील प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. दोन्ही संघांनी यूएईमध्ये मागचे १३ सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त अफगाणिस्तान संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये एखदाही पाकिस्तानला पराभूत केलेले नाही. शुक्रवारच्या सामन्यात या दोन संघांपैकी कोणता संघ विजयी होतो, हे पाहावे लागणार आहे.

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची सुरुवात चांगली झाली आहे. अफगाणिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडला १३० धावांनी पराभूत केले होते. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांच्या पहिल्या सामन्यात एकही विकेट न गमावता मोठा विजय मिळवला आहे. तसेच न्यूझीलंडला देखील ५ विकेट्सने पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलच्या मेगा लिलावाची लगबग सुरू! संघांना कधीपर्यंत रिटेन खेळाडूंची द्यावी लागेल माहिती? वाचा…

पहिल्या टी२० विश्वचषकात भारताच्या ‘या’ प्लेइंग इलेव्हनविरुद्ध न्यूझीलंडने मिळवला होता विजय, वाचा सविस्तर

ब्रेकिंग! दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस उतरला राजकारणाच्या मैदानात, तृणमूल काँग्रेस पक्षात केला प्रवेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---