आशिया चषक 2022 चा हंगाम संपायला आला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघात आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दुसरीकडे भारत, हाँगकाँग, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. साखळी फेरीतील धमाक्यानंतर सुपर-4 फेरीत सपशेल फेल ठरलेला अफगाणिस्तान संघ आता वेगळ्याच समस्येत अडकला आहे.
त्यांना लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमानतळावर इमिग्रेशनसाठी खेळाडूंना तब्बल ४ तास रांगेत उभे राहावे लागले आहे. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याने याबद्दल माहिती दिली आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत राशिदने सांगितले की, इमिग्रेशन डेस्कवर स्टाफच्या कमीमुळे सर्व खेळाडूंना तास-न्-तास रांगेत उभे राहावे लागले आहे. यादरम्यान त्यांना भरपूर त्रासही झाला. यानंतर राशिदने हीथ्रो विमानतळाच्या अधिकाऱ्यांना स्टाफ वाढवण्याची मागणी केली आहे.
राशिदने (Rashid Khna) ट्वीट करत लिहिले आहे की, “आम्ही सर्वजण (अफगाणिस्तानचा संघ) गेल्या 4 तासांपासून रांगेत उभे आहोत. दोन एयरलाइन्सच्या इमिग्रेशनसाठी डेस्कवर फक्त 2 लोकच (स्टाफ) आहेत. हीथ्रो कृपया तुमचा स्टाफ वाढवा. आम्ही सर्वजण आता अर्ध्या रस्त्यातच अडकलो आहोत. या ट्वीटमध्ये राशिदने हीथ्रो विमानतळाचे अधिकारी आणि अमिराती एयरलाइन्सला टॅग केले आहे.”
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 9, 2022
अफगाणिस्तान संघाला रिकामे हात परतावे लागले माघारी
अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. परंतु पुढे त्यांची गाडी डगमगली. अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा पहिलाच सामना 8 विकेट्सने जिंकला होता. त्यांनतर त्यांनी साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारली होती. त्यांनी बांगलादेशला 7 विकेट्सने झुकवले होते. मात्र सुपर- 4 फेरीत अफगाणिस्तानचा संघ विजय मिळवू शकला नाही. त्यांना पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने 4 विकेट्सने पराभूत केले.
त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानकडून 1 विकेटने पराभूत झाला. शेवटी त्यांना स्पर्धेची अखेरही पराभवानेच करावी लागली. भारताने 101 धावांनी अफगाणिस्तानला पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रिय विराट… पत्रास कारण की…
याला म्हणतात क्रेझ! विराटच्या शतकानंतर कोणी हॉस्टेल तर कोणी केला रस्त्यावर जल्लोष; पाहा व्हिडिओ
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे