राशिद खान हा टी२० क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. तो जगभरातील लीगमध्ये खेळतो. आपल्या लहानशा कार्यकर्दीत त्याने आजवर ४५० पेक्षा अधिक टी२० बळी मिळवले आहेत. ड्वेन ब्राव्होनंतर तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकामध्ये त्याच्यावरही नजर असेल. अफगाणिस्तानच्या संघाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असेल. बांगलादेश आणि श्रीलंकेचे संघही त्यांच्याच गटात आहेत. मात्र केवळ दोन संघांना सुपर फोरमध्ये जावे लागणार आहे. परंतु, लेगस्पिनर राशिदच्या फॉर्ममूळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
अफगाणिस्तानचा संघ सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. तिथे त्यांना पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. आयर्लंडचा संघ सध्या टी२० मालिकेत २-१ ने पुढे आहे. राशिदला आतापर्यंत पहिल्या तीन टी२० सामन्यांमध्ये एकही विकेट घेता आलेली नाही. तेवीस वर्षीय राशिदने पहिल्या टी२० मध्ये २५ धावा दिल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या टी२० मध्ये २७ धावा आणि तिसऱ्या टी२० मध्ये 38 धावा दिलेल्या. पहिल्या तीन सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही. फलंदाजीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर रशीदने नाबाद ०२, ०९ आणि ०० धावा केल्या.
राशिद खानने आतापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने ६४ सामन्यात १४ च्या सरासरीने १०९ बळी घेतले आहेत. ३ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने आत्तापर्यंत चारवेळा ४ बळी आणि दोनवेळा ५ बळी घेतले. तसेच १९८ धावाही केल्या आहेत. त्याच्या एकूण टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ३४० सामन्यांत १८ च्या सरासरीने ४६६ बळी घेतले आहेत. १७ धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते