---Advertisement---

तेजतर्रार राशिद! स्टार्क-ब्रेट‌ लीला मागे सोडत ‘त्या’ विक्रमावर सांगितला हक्क

On: मंगळवार, मार्च 1, 2022 9:45 PM
---Advertisement---

नुकतीच बांगलादेश व अफगाणिस्तान या आशियाई संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यजमान बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजय संपादन केला होता. अफगाणिस्तानने अखेरचा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा राखली. अनुभवी फिरकीपटू राशिद खान व सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज यांनी संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आपल्या शानदार गोलंदाजीने नेहमीच भल्याभल्यांना त्रासदायक ठरणाऱ्या राशिदने या सामन्यात एका खास विक्रमाला गवसणी घातली.

राशिदने टिपले तीन बळी

राशिद खान याने तीन बळी मिळवत बांगलादेश संघाला १९२ धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या कामगिरीसह एक खास विक्रम आपल्या नावे केला. राशिद आता सर्वात कमी डावांमध्ये १५० वनडे बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने ७६ डावांमध्ये ही कामगिरी केली. या बाबतीत पहिल्या स्थानी पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक प्रथम क्रमांकावर आहे. त्याने केवळ ७५ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा असून, त्याने ७७ डावांमध्ये १५० बळी टिपलेले. तर, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने ८० डावांमध्ये १५० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. श्रीलंकेचा अजंता मेंडिस व न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांनी १५० वनडे बळी मिळवण्यासाठी ८१ डाव खेळले होते.

अफगाणिस्तानचा मोठा विजय

बांगलादेश संघाने या सामन्यात क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. मात्र, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत त्यांना १९२ धावांवर रोखले. लिटन दास याने अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात, अफगानिस्तानने सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याच्या शतकी खेळीच्या जोरावर केवळ तीन गडी गमावत हे आव्हान पार केले. उभय संघांमध्ये ३ व ५ मार्च रोजी टी२० सामन्यांची मालिका खेळली जाईल.

महत्वाच्या बातम्या-

Video: पोलार्ड झाला फिरकीपटू! त्रिनिदाद टी१० स्पर्धेत यष्टीरक्षक फलंजादाला अडकवले फिरकीच्या जाळ्यात (mahasports.in)

विराटच्या १००व्या कसोटीसाठी बीसीसीआयची चाहत्यांसाठी खूशखबर, ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---