---Advertisement---

VIDEO: राशिदलाही पडली ‘गली क्रिकेट’ची भुरळ! भारतीय चाहत्यांसह लुटला जयपूरमध्ये आनंद

On: गुरूवार, मे 4, 2023 10:28 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स संघाची कामगिरी सातत्यपूर्ण होत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील हा संघ पहिल्यापासून अव्वल चारमध्ये दिसून येतो. गुजरातचा उपकर्णधर राशिद खान याच्यासाठी हा हंगाम आत्तापर्यंत समिश्र राहिला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध ते आपला पुढील सामना जयपूर येथे खेळतील. या सामन्याआधी राशिद याचा एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये तो गल्ली क्रिकेट खेळताना दिसतोय.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1654026646381563905?t=7JZvMEo52r24eZ4H2rIVHQ&s=19

 

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे शुक्रवारी (5 मे) जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर भिडणार आहेत. हा सामना खेळण्यासाठी जयपूर येथे आलेल्या राशिदने मोकळ्या वेळात रस्त्यावर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांसोबत खेळण्याचा आनंद लुटला. टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असलेल्या राशिदने फलंदाजी केली. तसेच, तो पायात चप्पल घातलेला दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

राशिद खान याच्यासाठी हा हंगाम आत्तापर्यंत तितका उत्कृष्ट राहिला नाही. 9 सामन्यांमध्ये त्याने 15 बळी मिळवले असले तरी, त्याच्या गोलंदाजीवर धावा मोठ्या प्रमाणात वसूल केल्या गेल्या आहेत. फलंदाजीतही तो संघासाठी फारसे योगदान देऊ शकला नाही.

गुजरात टायटन्सने या हंगामात आत्तापर्यंत नऊ सामने खेळले असून 6 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. ते सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर काबीज आहेत. आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवलेला गुजरात संघ या हंगामात देखील त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानविरूद्ध होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून ते आपले पहिले स्थान भक्कम करू पाहतील. दुसरीकडे राजस्थान हा सामना जिंकून पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात असेल.

(Rashid Khan Play Gully Cricket With Boys In Jaipur Video Goes Viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केदारने सांगितली आयपीएल कमबॅकची कहाणी! म्हणाला, “मी कॉमेंट्री करत होतो आणि…”
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---