---Advertisement---

राशिदने आयपीएलमध्ये ‘स्नेक शॉट’ने घातलेला धुमाकूळ, आता सराव करतानाचा Video तुफान Viral

On: शनिवार, जून 4, 2022 7:52 PM
Rashid-Khan
---Advertisement---

गुजरात टायटन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान याने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलच्या अनेक सामन्यांत त्याने अचंबित करणारे फटके मारले. त्यापैकी चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तर राशिदने विशेष चमक दाखवली. या सामन्यानंतर त्याने मारलेल्या फटक्यांबद्दल विचारणा केली असता त्याने या फटक्याला ‘स्नेक शॉट’ असे नाव दिले.

आता पुन्हा एकदा राशिद खान (Rashid Khan) याचा स्नेक शॉटचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो ‘स्नेक शॉट’ कसा पार पाडण्यात यशस्वी झाला हे त्याने उघड केले आहे. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने गोल्फ स्टिक पकडताना घेतलेल्या शॉटची कॉपी करत सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसत आहे.

या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनला ‘हेलिकॉप्टर यूएईमध्ये उतरले आहे,’ असा इशारा दिला आहे. सध्या अफगाणिस्तान विरुद्ध झिंबाब्वे या दोन संघात एकदिवसीय मालिका दुबई येथे सुरू आहे. त्यासाठी राशिद दुबईमध्ये पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी त्याने हा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना मनोरंजन देण्याचा प्रयत्न केला आहे. राशिदने हा व्हिडिओ शेअर करत झिंबाब्वे संघाला देखील इशारा दिला आहे.

दरम्यान, २३ वर्षीय राशिदने यंदाच्या हंगामात फलंदाजीत अद्भुत कामगिरी केली होती. सध्या तो अगदी चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने यंदाच्या हंगामात अनेक सामन्यांत चागली खेळी केली. ज्यामुळे गुजरातच्या पदरात यश पडले. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २१ चेंडूत ४० आणि हैदराबादविरुद्ध ११ चेंडूत ३१ धडाकेबाज खेळी केली. आयपीएलच्या सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीवर टीकेचा सामना करावा लागला असला, तरी त्याने पुनरागमन केले आणि १९ बळी घेऊन हंगाम संपवला. इतकेच नाही, तर त्याच्यासारखे अनेक मॅच फिनिशर आहेत, ज्यांच्यामुळे गुजरातचा संघ पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनला होता.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी

मुलींच्या हट्टासाठी गाण्यावर थिरकला डेविड वॉर्नर, पाहा व्हिडिओ

युझीचा ‘किल्लर’ लूक, टीम इंडियात पुनरागमन करण्याआधी चहलने केली नवी हेयरस्टाईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---