आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पाहुन अफगाणिस्तानचा प्रतिभाशाली गोलंदाज रशीद खानला आनंद झाला आहे. त्याने त्याचा आनंद ट्विट करुन व्यक्त केला आहे.
स्मिथने गुरुवारी, 28 जूनला ग्लोबल टी20 कॅनडा लीगमधून शानदार पुनरागमन केले. या लीगमध्ये त्याने टोरंटो नॅशनल संघाकडून खेळताना वॅनकूवर नाईट्स विरुद्ध 41 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला.
स्मिथच्या या दमदार पुनरागमनानंतर टी20 क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज राशीदने ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘स्मिथला परत क्रिकेट खेळताना पाहून आणि तेही त्याची चांगली खेळी पाहुन आनंद झाला.’
Pleased to see him back to the game and played classical inning well Played @stevesmith49 mate 🙌🏻👍🏻👍🏻 pic.twitter.com/NQaJKu52kM
— Rashid Khan (@rashidkhan_19) June 28, 2018
मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
मात्र स्मिथ आणि वार्नरला क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पहिल्यांदाचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी स्मिथ मैदानात उतरला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद
–रोनाल्डोच्या पोर्तुगालचं पुढच्या सामन्यात पराभूत होण्याच लाॅजिक रेस ३ पेक्षाही वाईट
–राहुल द्रविडचा हा सेल्फी पाहिलाय का? दोन दिग्गजांचा हा आहे ‘दिग्गज सेल्फी’