भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्व युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान राहिला आहे. ज्यांना धोनीसोबत खेळण्याची संधी भेटली ते स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतात आणि ज्या खेळाडूंना धोनीसोबत खेळण्याची संधी नाही मिळाली ते नेहमीच धोनीसोबत खेळण्याची वाट पाहत असतात. यामध्ये अफगाणिस्तानचा राशीद खानही मागे नाही. राशीदला सुद्धा धोनीसोबत आईपीएल खेळायची आहे.
इंडियन प्रिमियर लीग (आईपीएल) मध्ये सनरायजर्स हैदराबादचा अव्वल फिरकी गोलंदाज असलेल्या राशीदला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या नेतृत्वात खेळायचे आहे. त्याने सांगितले की, “माझे एक स्वप्न आहे की, मी धोनीच्या नेतृत्वात खेळावे. त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना मला खूप फायदा होऊ शकतो. गोलंदाजी करताना यष्टीरक्षकाची भूमिका तितकीच महत्वाची असते. त्यामुळे मला धोनीव्यतिरिक्त इतर दुसरा यष्टीरक्षक यासाठी अधिक योग्य वाटत नाही.”
राशीदने सांगितले कि, “भारतीय माजी दिग्गज क्रिकेटपटू धोनीने मला त्याचे अनुभव सांगितले आणि क्रिकेटच्या गोष्टींचे ज्ञान दिले. त्याने सांगितले की, क्षेत्ररक्षण करताना गरज नसेल तिथे डाइव्ह मारणे टाळ आणि थ्रो करताना त्या गोष्टींवर लक्ष दे. त्याने हा सल्ला भारतीय खेळाडू रवींद्र जडेजाला सुद्धा दिला होता.”
याखेरीज राशीद मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माबद्दल सांगतो की, “रोहित शर्माकडून सुद्धा मी खूप प्रभावित झालो आहे. रोहितकडे चेंडू खेळण्यासाठी अतिरिक्त वेळ आहे. मी खूप कमी खेळाडूंना पाहिले ज्यांचाकडे शॉट खेळण्यासाठी एवढा वेळ आहे. तो १४५-१५०च्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासमोर सुद्धा असेच शॉट मारतो, जणूकाही तो गोलंदाज १२०च्या गतीने गोलंदाजी करतो आहे.”
राशीद खान सध्याचा अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू असून त्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर संघाला अनेक जिंकवून दिले आहेत. राशीदने आजवर एकदिवसीय सामन्यांत १४०, कसोटी सामन्यांत ३४ आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ९५ गडी बाद केले आहेत. राशीद खान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. त्याव्यतिरिक्त राशीद पीएसएल, सीपीएल आणि बीबीएल या व्यावसायिक लीग स्पर्धासुद्धा खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह सामन्यात आपल्याच संघसहकाऱ्याला धडकला जो रूट अन् झालं असं काही
जवळपास ठरलं! १२७च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणारा ‘हा’ भारतीय श्रीलंका दौऱ्यावर करणार नेतृत्त्व
मांजरेकरांसोबतच्या पर्सनल चॅटिंगचे मेसेज फॅनकडून व्हायरल, पाहा काय म्हणालेत मांजरेकर जडेजाबद्दल