अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज लेग स्पिनर राशिद खानने त्याला वाटणाऱ्या जगातील टॉप पाच टी-२० खेळाडूंची नावे सांगितली आहेत. ही पाच खेळाडूंची यादी त्याने सांगितली असली तरी त्याचे स्वत:चे नाव या यादीत नाही. त्याने या यादित दोन भारतीय दिग्गजांचा समावेश केला आहे. तसेच न्यूझीलंड, साउथ अफ्रिका आणि वेस्टइंडीजच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश केला आहे.
राशिद खानने जगातील सर्वोत्कृष्ट पाच टी-२० खेळाडूच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स, वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या चार कर्णधारांव्यतिरिक्त भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचाही समावेश या दिग्गजांसोबत केला आहे.
राशिद खान टी२० विश्वचषकापूर्वी आयसीसीसोबत चर्चा करत होता. यावेळी त्याने विराट कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर खेळू शकतो आणि खेळपट्टीमुळे त्याच्या खेळीवर काही खास फरक पडत नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने एबी डिविलियर्स कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध वेगात धावा बनवू शकतो असे सांगितले आहे.
तो म्हणाला की, “विराट कोहलीला खेळपट्टीमुळे काही फरक पडत नाही. खेळपट्टी कशीही असली तरी, तो येऊन प्रदर्शन करतो. तसं एबी डिविलियर्स एक खतरनाक फलंदाज आहे, जो कोणत्याही स्टेजवर, कोणत्याही गोलंदाजासोबत वेगात धावा करू शकतो. याव्यतिरिक्त तो कोणताही शॉट खेळण्यासाठी सक्षम आहे. एका कर्णधाराच्या रूपात तुम्ही त्याच्यासारख्या फलंदाजाला नक्कीच तुमच्या संघात सामील करू इच्छित असणार.”
हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डविषयी बोलतानाही त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या दोघांविषयी बोलताना सांगितले आहे की, हे दोघेही संघाला सामन्यात विजय मिळवून देऊ शकतात. तो म्हणाला की, “हे दोघे माझे प्रमुख फलंदाज असतील. जर संघाला शेवटच्या पाच षटकांमध्ये ८० – ९० धावांची गरज असेल, तर हे फलंदाज करू शकतात. हे असे फलंदाज आहेत, जे तुमचे काम सोपे करतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ‘या’ गोलंदाजामुळे एलिमिनेटर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, माजी भारतीय क्रिकेटरचे वक्तव्य
रवी शास्त्रींनंतर कधी मिळणार टीम इंडियाला नवा प्रशिक्षक? महत्त्वाची माहिती आली समोर
राष्ट्र प्रथम! टी२० विश्वचषकात टीम इंडियाच्या मेंटाॅरशीपचा धोनी घेणार नाही एकही रुपया






