अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. त्या आपल्या फिरकी लेग स्पिन गोलंदाजीच्या जोरावर 52 सामन्यात 118 विकेट घेतल्या आहेत.
त्याची 14.47 ची जबरदस्त सरासरी आहे. अफगाणिस्तानसाठी डेथ ओव्हर मधील तो महत्वाचा गोलंदाज बनला आहे.
आताच संपलेल्या एशिया कप स्पर्धेत त्याने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो बांग्लादेशचा मिस्तफिजूर रेहमानत, भारताचा कुलदीप यादवच्या बरोबरीने तो एक नंबरला आहे.
Today I’m privileged & very happy for the @ICC All-Rounder No:1⃣ ODI Bowler NO:2⃣& T20 Bowler No:1⃣ World Ranking. High achievement usually takes place in the framework of high expectation & optimism is the faith that leads. Thank you for all your prayers. pic.twitter.com/xpUQPmhvbb
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 30, 2018
त्याने चार डावात 87 धावा केल्याने त्याने आयसीसी वन-डे अष्टपेैलू खेळाडूंच्याक्रमवारीत तो आता सर्वात वरती पोहचला आहे. त्याच्या नावावर 353 गुण जमा झाले आहेत. त्याच प्रमाणे तो गोलंदाजांच्या यादीत भारताच्या जसप्रित बुमराह नंतर दूसऱ्या क्रमांकावर आहे.
“अश्या चांगली कामगिरी तेव्हाच होते जेव्हा मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढतात त्यामध्ये तुम्ही सकारात्मक रहायला हव, आपल्या सर्व प्रार्थनासाठी मी तुमचा आभारी असल्याचे” राशिद खानने सांगितले.
राशिदने 2018 मध्ये आयपीएलमध्ये सनराईझर्स हैदराबाद खेळताना उत्कृष्ट्र कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ
-रोहित शर्माला कसोटी संघात न घेतल्यामुळे भज्जी भडकला!
-विराटला बाद करण्याचा मंत्र सापडला- वकार युनुस