आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ त्यांच्या काही खेळाडूंना कायम ठेवू शकतात. मात्र, संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकते याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यंदाच्या नव्या हंगामापूर्वी सर्व संघात बदल होणार असल्याने अनेक संघांचे कर्णधारही बदलण्याच्या तयारीत आहेत.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सही आपल्या काही खेळाडूंना कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या बातमीद्वारे आम्ही अशा चार खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांना गुजरात फ्रँचायझी कायम ठेवण्याचा प्रयत्न करु शकते.
गुजरात टायटन्स या चार खेळाडूंना कायम ठेवू शकते
4. मोहम्मद शमी
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. शमीला एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर दुखापत झाली आणि तो आयपीएल 2024 खेळू शकला नाही. विश्वचषकात शमीने अत्यंत धोकादायक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने आतापर्यंत गुजरातसाठी 2 हंगाम खेळले असून त्यात त्याने 48 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने चांगली कामगिरी केली आणि दोन्ही हंगामात संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा स्थितीत त्याला कायम ठेवण्याचा संघ नक्की प्रयत्न करेल.
3. साई सुदर्शन
साई सुदर्शनसाठी आयपीएल 2024 शानदार होते. साईने गुजरात टायटन्ससाठी खूप धावा केल्या होत्या. त्याने 12 सामन्यात 527 धावा केल्या, जे 17 व्या सत्रात गुजरात संघासाठी फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. अशा स्थितीत गुजरात टायटन्सला या युवा खेळाडूला कायम ठेवायला आवडेल.
It takes a lot of efforts to look this effortless. 💯#AavaDe pic.twitter.com/zKvDiVzDqI
— Gujarat Titans (@gujarat_titans) August 12, 2024
2. राशिद खान
राशिद खान हा गुजरात टायटन्स संघाचा प्राण मानला जातो. हा खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी करतो. मात्र, आयपीएल 2024 रशीदसाठी काही खास नव्हते. या मोसमात गोलंदाजी करताना राशिदने 10 विकेट घेतल्या होत्या पण टी-20 क्रिकेटमधील या खेळाडूच्या क्षमतेवर शंका घेतलीच जाऊ शकत नाही.
1. शुबमन गिल
हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर, शुबमन गिलला आयपीएल 2024 मध्ये संघाचा कर्णधार बनवण्यात आले. गिलने शानदार फलंदाजी करत 12 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 426 धावा केल्या, ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. कर्णधाराच्या भूमिकेत गिलने साजेल अशी कामगिरी केली नसली तरी. संघ त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून संघात कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा-
वयाच्या 40 व्या वर्षी भारतीय विकेटकीपरची ‘घरवापसी’, देशांतर्गत हंगाम खेळण्यास तयार, निवृत्तीबाबतही केलं मोठं वक्तव्य!
विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल! चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया; दुलीप ट्राॅफीशी खास संबंध?
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला रडवलेली बॅट क्रिकेटमधून निवृत्त, पाहा कोणत्या क्रिकेटरची आहे ‘ती’ बॅट