---Advertisement---

राशीद खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? पाहा काय दिलं उत्तर

On: शनिवार, जून 5, 2021 12:34 AM
---Advertisement---

क्रिकेट आणि बॉलीवूड यांचं पूर्वीपासूनच एक विशेष नातं राहिलेलं आहे. अनेक खेळाडूंच्या अभिनेत्रींसोबत प्रेमप्रकरणाच्या चर्चा होत असतात. तसेच भारतीय संघातील टायगर पतोंडीपासून ते आताच्या विराट कोहलीपर्यंत अनेक खेळाडूंनी चित्रपट अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधली आहे. एवढेच नाही, तर काही क्रिकेटपटू असेही आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये कामही केले आहे. नुकतेच अफगाणिस्तानचा आघाडीचा फिरकीपटू राशीद खानला बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उत्तरही दिले आहे.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान हा सोशल मीडियातून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्याला भारतातही अनेक चाहते मिळाले आहेत. तसेच तोही भारतीय चाहत्यांबद्दल आणि भारताबद्दल चांगले बोलत असतो. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर चाहत्यांसह प्रश्न-उत्तरांचे सत्र आयोजित केले होते.

यादरम्यान, एका चाहत्याने त्याला प्रश्न केला की, ‘बॉलिवूडमध्ये येण्याचा काही विचार आहे का तुझा?’ त्याला ह्या अफगाण फिरकीपटूने मजेशीर उत्तर दिलं की, “आमंत्रण आलं तर येईन भाऊ”.

Screengrab: Instagram/Rashid Khan

दुसऱ्या एका चाहत्याने राशीद खानला असाच एक प्रश्न केला की, ‘बॉलीवूड कधी जॉईन करतोय?’ त्यावर राशीदने उत्तर दिले की, ‘लवकरच’. यावरून साफ लक्षात येते की भारतीय चाहते त्याला चित्रपटात बघण्यास उत्सुक आहे.

Screengrab: Instagram/Rashid Khan

आयपीएल स्पर्धेत राशीद खान सनरायझर हैद्राबाद संघचा भाग आहे, परंतु सध्या पीएसएलसाठी तो अबूधाबीला पोहोचला आहे. तिथे विलगीकरण कालावधी पूर्ण करून तो लाहोर कलंदर संघात सामील होईल.

जागतिक क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार
अफगाणिस्तान संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानच्या नावावर सर्वात युवा कसोटी कर्णधार असण्याचा विक्रम आहे. रशीदने वयाच्या २० वर्षे ३५० दिवशी कसोटीत अफगाणिस्तानच्या नेतृत्वाची पहिल्यांदा जबाबदारी सांभाळली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘इंग्लंडमध्ये कसोटी खेळणे एक आव्हान, पण…’, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने दिले आपल्याच बोर्डाला आव्हान; ‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणी केली ‘ही’ मागणी.

फलंदाजीत ‘हे’ बदल कर, पाकिस्तानी दिग्गजाचा विराट कोहलीला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---