---Advertisement---

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने दिले आपल्याच बोर्डाला आव्हान; ‘बॉल टेम्परिंग’ प्रकरणी केली ‘ही’ मागणी.

On: शुक्रवार, जून 4, 2021 11:49 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आणि विवाद हे नातं जुनं आहे. विविध कारणांमुळे हा संघ विवादात असतो कधी परदेशी खेळाडूंना स्लेजिंग करणे असो किंवा ऑस्ट्रेलिया चाहत्यांकडून झालेली हुर्रेबाजी असो. ऑस्ट्रेलियन संघाचा “बॉल टेम्परिंग” विवाद काही वर्षांपासून चर्चेचा विषय होऊन बसला आहे. बऱ्याच दिग्गज खेळाडूंनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात माजी ऑस्ट्रेलियन सहाय्यक प्रशिक्षकांनी देखील यासंदर्भात आपलं विधान केले आहे.

माजी प्रशिक्षक डेव्हिड साकेर यांनी सांगितलं की “बॉल टेम्परिंग” वादाचा अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. डेव्हिड साकेर 2018 सालच्या केपटाऊन कसोटीत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सामील होते, त्याच सामन्यात ही घटना घडली होती. या प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घातली गेली होती.

थांबता थांबेना ‘बॉल टेम्परिंग’ वाद
‘मेलबर्न ग्रेनेड’ संघाचे प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्यावर डेव्हिड साकेर यांनी विधान केले की, ‘मला अस कोणतंच ठोस कारण वाटत नाही की ज्यामुळे हा अहवाल जाहीर करायला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अडचण असेल. परंतु हे ऑस्ट्रेलियन समितीवर अवलंबून असेल की ते हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतील. ह्या संदर्भात अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे जर अहवाल जाहीर केला तर लोक प्रश्न उपस्थित करणार नाही, परंतु मला वाटतं क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसे करणार नाही.’

गेल्या महिन्यात बॅनक्रॉफ्टने या प्रकरणाबद्दल गोलंदाजांनाही माहीती असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते.

डेव्हिड साकेर यांनी खेळाडूंचा केला बचाव:
बॅनक्रॉफ्टच्या दाव्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझेलवूड, नॅथन लायन या सर्व गोलंदाजांनी आपल्याला त्या सामन्यात घडलेल्या बॉल टेम्परिंगबद्दल अजिबात कल्पना नव्हती, असे म्हटले आहे.

डेव्हिड साकेरने सांगितलं की, ‘मी त्यावेळी जे पाहिले ते सगळं जाहीरपणे सांगितलं आहे. मला नाही माहीत की ‘सॅंडपेपर’चा वापर झाला आहे की नाही, परंतु हे सांगू शकतो की चेंडू ‘रिव्हर्स स्विंग’ करण्यासाठी आम्ही सामान्य रणनीती ठरवली होती.’

महत्त्वाच्या बातम्या –

फलंदाजीत ‘हे’ बदल कर, पाकिस्तानी दिग्गजाचा विराट कोहलीला सल्ला

‘भारत इंग्लंडला ४-० ने पराभूत करणार’, सुनील गावसकरांनी केली भविष्यवाणी, दिले ‘हे’ कारण

पंतच्या गर्लफ्रेंडने सुरु केले फॅशन स्टोअर; रिषभने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---