विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच स्पर्धात्मक बनत चालली आहे. सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघ विश्वचषकाच्या 22व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला आठ गाड्यांनी पराभूत करत दुसरा विजय मिळवला. यानंतर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशीद खान यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण भारतीयांची मने जिंकली.
चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अनेकांनी पाकिस्तानला विजयाची पसंती दिली होती. मात्र, अफगाणिस्तान उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केले. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना राशिद याने त्यांना पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचे आभार व्यक्त केले. तो म्हणाला,
“आमच्या संघाकडे विराट आणि बुमरासारखे मोठे खेळाडू नाहीत. मात्र, तरीदेखील आम्ही पाकिस्तानला पराभूत करण्यात यशस्वी ठरलो. आमच्या सर्वच खेळाडूंनी मेहनत केली. आम्हाला आमच्या देशाच्या समर्थकांचा देखील मोठा पाठिंबा होता. मात्र, त्यासोबतच आमच्यावर भारतीय जनतेचे देखील मोठे प्रेम होते. आम्ही या यशाचे श्रेय नक्कीच आम्हाला पाठिंबा देणाऱ्या भारतीयांना देऊ इच्छितो.”
या सामन्यात मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षकांनी अफगाणिस्तान संघाला पाठिंबा दिला होता. तसेच या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने अफगाणिस्तान संघासोबत आनंदोत्सव साजरा केला. या सामन्याचा विचार केल्यास पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान समोर 284 धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. मात्र, त्यांनी या धावसंख्येचा दबाव न घेता केवळ दोन गडी राखून विजय संपादन केला. याच विश्वचषकात अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंडला देखील पराभूत करण्याची किमया करून दाखवली आहे
(Rashid Khan Thanks To Indian Fans After Win Over Pakistan)
हेही वाचा-
गंभीरने खोलली पाकिस्तानची पोल; सांगून टाकल्या 3 सर्वात मोठ्या कमकुवत बाजू, लवकर सुधराव्या लागतील…
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…