---Advertisement---

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

On: शनिवार, मे 26, 2018 7:31 AM
---Advertisement---

कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हैद्राबाद आणि चेन्नई हे दोन संघ यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर होते. त्यामुळे आता या दोन अव्वल संघांमध्ये आयपीएल 2018 चा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे.

या सामन्यात ज्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देण्यात आला त्या राशीद खानला सचिनने टी२०मधील सर्वात चांगला गोलंदाज म्हटले आहे.

“मला नेहमी वाटायचं की राशीद एक चांगला गोलंदाज आहे परंतु आता मला कोणतीही शंका नाही की तो टी२०मधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे फलंदाजीचे कौशल्य आहे. एक चांगला खेळाडू.” असे ट्विट करत सचिनने राशीदचे कौतुक केले आहे.

राशीदनेही ट्विट करत मास्टर ब्लास्टरचे आभार मानले आहे.

राशीदने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ३२ धावा केल्या, तसेच २ झेल घेत सामन्यात ३ विकेटही घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये सहाव्यांदा झाला असा कारनामा

IPL 2018: हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात

इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!

आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल

टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment