---Advertisement---

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

On: शुक्रवार, नोव्हेंबर 30, 2018 3:06 PM
---Advertisement---

दुबई। शारजा येथे सुरु असलेल्या टी10 लीग स्पर्धेत बुधवारी(28 नोव्हेंबर) पखटून्स विरुद्ध मराठा अरेबिएन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात पखटून्स संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने मराठा अरेबिएन्सकडून खेळताना एमएस धोनीचा ट्रेडमार्क असलेला हॅलिकाॅप्टर शॉट मारत सर्वांचेच लक्ष वेधले.

रशीदने 9 व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर मोहम्मद इरफानच्या गोलंदाजीवर डीप मिड विकेटला षटकार मारला. हा षटकार रशीदने धोनीप्रमाणेच हॅलिकाॅप्टर शॉट मारला. त्याचा हा फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या विरेंद्र सेहवागही प्रभावित झाला. त्याने उभे राहून त्याच्यासाठी टाळ्याही वाजवल्या.

याचा व्हिडिओ रशीदने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्याने एमएस धोनीलाही #Helicopters #Inventer असे हॅशटॅगसह टॅग केले आहे.

या सामन्यात रशीदने 7 चेंडूत 21 धावा करताना 2 षटकार आणि 2 चौकार मारले. मात्र तो शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या:

मैदानावरुन पृथ्वी शाॅला अक्षरश: उचलुन ड्रेसिंग रुममध्ये नेले

हॉकी विश्वचषक २०१८: आज चीन समोर असणार बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आर्यलॅंड सज्ज

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment