भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने नुकतेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी आपले पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्या दोन सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वत्र त्याचे कौतुक होत असताना पाकिस्तानातून मात्र त्याच्यावर टीका केली गेली आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये कमतरता असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राशिद लतिफ यांनी म्हटले.
अर्जुन तेंडुलकर हा मागील तीन वर्षापासून मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. त्याला सलग दोन हंगामात बाकावर बसावे लागले. या हंगामात मात्र केकेआरविरुद्ध त्याने आपला पहिला सामना खेळला. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अनेक माजी क्रिकेटपटू तसेच चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. मात्र, लतिफ यांनी एका कार्यक्रमात बोलताना अर्जुनची एक कमजोरी असल्याचे सांगितले. ते म्हणाले,
“अर्जुन आता त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आहे. त्याचे बॉडी अलाइनमेंट योग्य नाहीत. एका चांगल्या बायोमॅकॅनिझम कन्सल्टंटकडून सल्ला घेणे गरजेचे वाटते. स्वतः सचिन याबाबत चांगले समजावून सांगू शकतो. मात्र, तो देशांतर्गत क्रिकेटवर अवलंबून आहे. चेंडू टाकल्यानंतर अर्जुनचे संतुलन योग्य नसते. मात्र त्यावर काम केल्यास अर्जुनचा वेग वाढू शकतो.”
लतिफ पुढे म्हणाले,
“अर्जुन दुसऱ्या एखाद्या संघात असता तर त्याचा माईंड सेट वेगळा असता. आत्ता त्याचे वडीलच ड्रेसिंग रूमचा भाग आहेत. सचिनने एक वडील नव्हे तर एका क्रिकेट प्रशिक्षकाच्या नात्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे.”
अर्जुनने आपल्या पहिल्या सामन्यात 2 षटके टाकताना 17 धावा दिलेल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना त्याने संघाचा विजय साकारला होता.
(Rashid Latif Remark On Arjun Tendulkar Bowling Talk About Sachin Tendulkar Presence)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर मात
प्रमोशन फेरीत कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाचा विजय