प्रत्येक एका गोलंदाजाचे स्वप्न असते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मी एखाद्या दिग्गज फलंदजाला बाद करावे. काही गोलंदाजांचे ते स्वप्न पूर्ण होते काही गोलंदाजांचे नाही होत. पण, त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर जो आनंद त्या गोलंदाजाला मिळतो, तो त्याच्याशिवाय इतर कोणीही सांगू शकत नाही. अफगाणिस्तानचा युवा लेगस्पिनर राशिद खानबाबत देखील असाच एक प्रसंग घडला होता. जेव्हा त्याने भारताच्या एका दिग्गज फलंदाजाला बाद केले होते, तो क्षण त्याच्यासाठी स्वप्नवत ठरला होता.
राशिद खान इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. २०१८ सालच्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात राशिदने चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बाद केले होते. ही विकेट त्याचासाठी एखाद्या स्वप्नासारखी होती, असा खुलासा त्याने नुकताच केला.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना राशिदने सांगितले की, “धोनीची विकेट घेणे माझ्यासाठी एका स्वप्नासारखे होते. तुम्हाला माहितीच आहे की, धोनी फिरकीविरुद्ध किती चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे त्याची विकेट घेणे माझ्यासाठी खूप मोलाचे होते.”
चेन्नई संघाचा प्रशिक्षक मायकेल हसीने बादफेरीत राशिदच्या गोलंदाजीचे अभ्यास केला होता. अभ्यास करताना त्याला समजले की, लेगस्पिन करताना राशिदच्या चेंडूची पकड मोठी असते. आणि जेव्हा तो ‘गुगली’ चेंडू टाकतो तेव्हा बोटं जवळ ठेवतो. हसीने सामना सुरु होण्यापूर्वी ही गोष्ट संघातील खेळाडूंना सांगितली होती.
परंतु, हा अभ्यास काही कामी आला नाही. राशिदने धोनीला त्रिफळाचीत केले. धोनीने या डावात १८ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. याबाबत बोलतांना राशिद म्हणाला, “मला वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या बोटांचा वापर करून गोलंदाजी करायला काहीच अडचण येत नाही. मी कधीच चेंडू फेकण्याचा अगोदर ठरवत नाही की, मला हाच चेंडू टाकायचा आहे. नेहमीच पंचांना पार केल्यानंतर ठरवतो की, कुठला चेंडू फेकू. त्यामुळेच मला यश मिळते.”
महत्वाच्या बातम्या:
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा
गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण






