ओमान येथे खेळल्या जात असलेल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत इंडिया ए संघाचा दुसरा सामना युएई ए संघाविरुद्ध झाला. पाकिस्तान ए विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यातही दमदार गोलंदाजी केली. भारताच्या गोलंदाजांनी युएईचा डाव केवळ 107 धावांमध्ये गुंडाळला. युवा वेगवान गोलंदाज रसिख सलाम दार याने आपल्या पहिल्या पाच चेंडूतच तीन फलंदाजांना बाद केले.
तुलनेने अनुभवी असलेल्या भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दुबळ्या युएईला पुरते निष्प्रभ केले. वैभव अरोरा व अंशुल कम्बोज यांनी पहिले दोन गडी बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या रसिख सलाम याने पहिल्याच चेंडूवर निलांश केसवानी याला बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर विष्णू याला यष्टिरक्षक प्रभसिमरन याच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सईद याचा त्रिफळा उडवला.
भारतीय संघासाठी त्याच्या व्यतिरिक्त रमनदीप सिंग याने दोन बळी मिळवले. तर वैभव अरोरा, अंशुल कम्बोज, अभिषेक शर्मा व नेहल वढेरा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखून पराभूत केले होते. भारतीय संघाला मागील वर्षी झालेल्या या स्पर्धेत पाकिस्तान ए संघाकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व युवा फलंदाज तिलक वर्मा हा करत आहे.
RASIKH SALAM STORM IN ACC EMERGING ASIA CUP 🤯
– 3 wickets in just 5 balls, What a talent, A star in making. pic.twitter.com/xDMj87ihal
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2024
रसिख सलाम दार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि कश्मीर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग राहिला आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघात असून, संघ त्याला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या स्पर्धेतील त्याची कामगिरी अशीच राहिल्यास आगामी आयपीएल लिलावात त्याला मोठी बोली लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्या दोघांना माझा तिरस्कार वाटायचा, कारण…”, स्टिव्ह स्मिथचे सहकारी खेळाडूंवर आरोप
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?