---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी व्हॅन डर दसनचा मोठा पराक्रम, डिविलियर्सला मागे टाकत रचला नवीन विक्रम

On: शनिवार, नोव्हेंबर 6, 2021 11:35 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचा ३९ वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी (०६ नोव्हेंबर) शारजाह येथे खेळला गेला. इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. रस्सी व्हॅन डर दसन नाबाद ९४, तर एडन मार्करमने ५२ धावा केल्या. रस्सी व्हॅन डर दसनने आपल्या खेळी दरम्यान एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रस्सी व्हॅन डर दसनने दक्षिण आफ्रिकेकडून टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळताना सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. त्याने ६० चेंडूत ९४ धावा ठोकल्या. आपल्या खेळी दरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत हर्षेल गिब्सने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९० धावांची खेळी खेळली होती. याच विश्वचषक स्पर्धेत जस्टीन केम्पने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ८९ धावांची खेळी खेळली होती. २०१४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत जेपी ड्युमिनीने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ८६ धावांची खेळी खेळली होती, तर २००९ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत एबी डिविलिर्सने स्कॉटलंडविरुद्ध नाबाद ७९ धावांची खेळी खेळली होती.

तत्पूर्वी, इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकन संघाने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या होत्या. रस्सी व्हॅन डर दसनने नाबाद ९४ त्याने आपल्या खेळी दरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले, तर एडन मार्करमने ५२ धावा केल्या.

दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूत १०३ धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉकनेही २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

-वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन ‘या’ ५ खेळाडूंना द्यावी संधी; वीरेंद्र सेहवागने सांगितली नावे

काय सांगता! राजस्थान रॉयल्सची साथ सोडून संजू होणार ‘या’ संघाच्या ताफ्यात सामील?

-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---