‘ब’ गटातील लढतीचा आजचा चौथ्या दिवशी रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स यांच्यात पहिली लढत झाली. गुणतालिकेत रत्नागिरी पाचव्या स्थानी तर नंदुरबार सहाव्या स्थानी होती. सामन्याची सुरुवातीला रत्नागिरी संघाने आघाडी मिळवली होती. रत्नागिरीच्या तिन्ही चढाईपटूंना गुण मिळाले होते. मात्र नंदुरबारच्या तेजस काळभोर ने सामना फिरवत आघाडी कमी केली.
मध्यंतराला रत्नागिरी 22-12 अशी आघाडी मिळवली होती. साईराज कुंभारच्या अष्टपैलू खेळाने तर श्रेयस शिंदे च्या चतुरस्त्र चढायानी रत्नागिरी संघाने आघाडी मिळवली. नंदुरबार कडून तेजस काळभोर एकाकी झुंज देत होता.
मध्यंतरानंतर मात्र नंदुरबार संघाने चांगली टक्कर देत सामन्यात चुरस निर्माण केली. पण अटीतटीच्या लढतीत रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने 33-32 असा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. रत्नागिरी कडून साईराज कुंभार ने अष्टपैलू खेळ करत 13 गुण मिळवले. तर श्रेयस शिंदे ने 8 गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली. नंदुरबारच्या तेजस काळभोर ची 15 गुणांची खेळी मात्र व्यर्थ गेली. (Ratnagiri Aravalli Arrows third win)
बेस्ट रेडर- तेजस काळभोर, नंदुरबार हिमालयन ताहर्स
बेस्ट डिफेंडर्स- साईराज कुंभार, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- श्रेयस शिंदे, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेमुळे आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची वाचलीये कारकीर्द, करियर संपल्याचे बोलले जात असलेल्यांना धोनीने दिली संधी
आयपीएलचा सर्वोत्तम फिनिशर! रिंकू सिंगने डेविड मिलरसह धोनीचा मोठा विक्रमही मोडला