---Advertisement---

रत्नागिरी जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सर्वकाही…

On: शनिवार, ऑगस्ट 18, 2018 12:02 PM
---Advertisement---

-पराग कदम

चिपळूण | रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटना आयोजित किशोर / किशोरी गट व कुमार / कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा १९ आॅगस्टपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट इनडोअर स्टेडियम डेरवण, चिपळूण येथे आयोजीत करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये १८ मुलांचे व १८ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी रत्नागिरी कबड्डी संघटनेने चांगली तयारी केली आहे.

प्रो कबड्डी तसेच महा कबड्डीमुळे या खेळाला गतवैभव प्राप्त झाले आहे. याचीच झलक या स्पर्धेत पहायला मिळणार आहे.

स्पर्धेतून काय हाती लागणार?

या स्पर्धेतील संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. त्यानंतर प्रशिक्षण शिबीरानंतर मुले आणि मुलींच्या अंतिम १२ खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. हा संघ ३० आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या काळात मुलुंड, मुंबई येथे होणाऱ्या ४५व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्याकडून खेळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार

एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment